नवी दिल्ली, (प्रतिनिधी) ९ मे - देशाच्या संरक्षण दलाच्या सर्वोच्च पदी नियुक्तीबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी (निवृत्त) यांची देशाचे नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते विद्यमान सीडीएस जनरल अनिल चौहान यांची जागा घेतील.
३१ मे रोजी पदभार स्वीकारणार
विद्यमान चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांचा कार्यकाळ ३० मे २०२६ रोजी संपुष्टात येत आहे. त्यानंतर, ३१ मे २०२६ रोजी लेफ्टिनेंट जनरल सुब्रमणी अधिकृतपणे देशाच्या सर्वोच्च लष्करी पदाचा पदभार स्वीकारतील. सीडीएस म्हणून जबाबदारी सांभाळण्यासोबतच ते लष्करी व्यवहारांच्या विभागाचे (DMA) सचिव म्हणूनही काम पाहणार आहेत.
महत्त्वाच्या जबाबदाऱ्या
सीडीएस म्हणून लेफ्टिनेंट जनरल सुब्रमणी यांच्यासमोर तिन्ही सैन्यदलांमध्ये (लष्कर, नौदल आणि वायुसेना) समन्वय साधणे आणि थियेटर कमांड्सच्या निर्मितीला गती देण्याचे महत्त्वाचे आव्हान असेल. त्यांच्या प्रदीर्घ लष्करी अनुभवाचा फायदा देशाची संरक्षण सज्जता अधिक मजबूत करण्यासाठी होणार आहे.