नाशिक, (प्रतिनिधी) ६ मे - शहरातील जयभवानी रोड परिसरात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला 'उचलून नेण्याची' धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात हर्षद केंद्रे या संशयिताविरुद्ध विनयभंग आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास कमला पार्क परिसरात ही घटना घडली. पीडित मुलगी आपल्या घराच्या परिसरात असताना संशयित हर्षद केंद्रे याने तिला गाठले आणि तिचा विनयभंग केला. इतक्यावरच न थांबता, "तू कुठे बाहेर दिसलीस तर तुला उचलून नेईन," अशी धमकीही त्याने दिली.
या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने आपल्या आजीला सर्व हकीकत सांगितली. आजीने धीर दिल्यानंतर पीडितेने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोरपडे करत आहेत. महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
नाशिक : जेलरोड येथील कॅनोलरोड भागात राहणाºया १८ वर्षीय युवतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर तरूणीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कावेरी रवी तायडे (रा.आम्रपाली नगर,इच्छामणी मंदिरा समोर कॅनोलरोड) असे मृत युवतीचे नाव आहे. कावेरी तायडे हिने मंगळवारी (दि.५) दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या रूममध्ये लाकडी बल्लीला हिरवी साडी बांधून गळफास लावून घेतला होता. मामेभाऊ अविनाथ आहिरे यांनी तिला तातडीने बिटको हॉस्पिटल येथे दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. हवालदार आहेर तपास करीत आहेत.