आयपीएलच्या प्लेऑफचे वेळापत्रक जाहीर... 'आरसीबी'च्या चाहत्यांना मोठा धक्का...

Share:
Main Image
Last updated: 06-May-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ६ मे - आयपीएल २०२६ आता एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचली आहे. सर्व संघांचे १० सामने पूर्ण झाले असून प्लेऑफची शर्यत चुरशीची झाली आहे. अशातच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) प्लेऑफ आणि अंतिम सामन्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र, या वेळापत्रकामुळे बेंगळुरूच्या चाहत्यांचा मोठा हिरमोड झाला असून, यंदाचा अंतिम सामना जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर म्हणजेच अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे.

बेंगळुरूकडून यजमानपद हिरावले

या हंगामातील अंतिम सामन्याचे यजमानपद आधी बेंगळुरूकडे सोपवण्यात आले होते. मात्र, स्थानिक संघटना आणि प्रशासनाच्या काही अटी बीसीसीआयच्या नियमावलीत बसत नसल्याने हा निर्णय बदलण्यात आला आहे. तांत्रिक आणि लॉजिस्टिक कारणांमुळे आता हे सामने तीन वेगवेगळ्या शहरांमध्ये विभागण्यात आले आहेत.

असा असेल प्लेऑफचा रणसंग्राम:

क्वालिफायर १ (२६ मे): साखळी फेरीतील अव्वल दोन संघांमध्ये धरमशाला येथील एचपीसीए (HPCA) स्टेडियमवर ही लढत होईल. जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये जाईल.

Advertisement

एलिमिनेटर (२७ मे): गुणतालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघांमधील लढत न्यू चंदीगड येथील नवीन आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडेल.

क्वालिफायर २ (२९ मे): एलिमिनेटरचा विजेता आणि क्वालिफायर १ मधील पराभूत संघ यांच्यात न्यू चंदीगडमध्येच अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दुसरी संधी मिळेल.

अंतिम सामना (३१ मे): रविवारी ३१ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर या हंगामाचा महामुकाबला खेळवला जाईल.

ठळक वेळापत्रक (IPL 2026 Playoffs):

?s=20

Comments

No comments yet.