जनगणनेच्या नावाखाली सोशल मीडियावर फेक अर्जाचा सुळसुळाट... 'या' दोन अधिकृत मार्गांचाच करा वापर...

Share:
Main Image
Last updated: 03-May-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ३ मे - देशात जनगणना २०२७ च्या प्रक्रियेला सुरुवात झाली असतानाच, सोशल मीडियावर जनगणनेचा एक अर्ज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, हा अर्ज पूर्णतः बनावट आणि अनधिकृत असल्याची माहिती राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (DGIPR) दिली आहे. आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनी कोणत्याही अनधिकृत लिंक किंवा अर्जावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

जनगणनेसाठी केवळ दोनच अधिकृत मार्ग

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात ३३ अधिसूचित प्रश्नांची माहिती देण्यासाठी सरकारने केवळ दोनच अधिकृत माध्यमे निश्चित केली आहेत:

१. स्व-नोंदणी (Self-Enumeration):

नागरिक https://se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन स्वतः आपली माहिती भरू शकतात. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एक 'SE ID' प्राप्त होईल. हा आयडी नंतर घरी येणाऱ्या प्रगणकाला पडताळणीसाठी दाखवणे आवश्यक आहे.  

Advertisement

२. प्रगणकांकडे थेट माहिती देणे:

ज्यांनी ऑनलाईन नोंदणी केली नाही, त्यांच्या घरी १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत अधिकृत प्रगणक येतील. त्यांच्याकडे प्रत्यक्ष माहिती देऊन आपली नोंदणी करता येईल.  

प्रशासनाचा इशारा

सोशल मीडिया किंवा इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मवर फिरणाऱ्या अनधिकृत अर्जांद्वारे किंवा अनोळखी व्यक्तींना आपली संवेदनशील वैयक्तिक माहिती देऊ नका. डिजिटल युगात माहितीची चोरी होण्याची शक्यता असल्याने केवळ अधिकृत सरकारी संकेतस्थळाचाच वापर करावा.

?s=20

Comments

No comments yet.