मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील 'मिसिंग लिंक'साठी कडक नियम... बघा, काय आहेत ते?

Share:
Main Image
Last updated: 03-May-2026

लोणावळा, (प्रतिनिधी) ३ मे - यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील 'मिसिंग लिंक' (कनेक्टिंग लिंक) लोकार्पणानंतर प्रवासासाठी खुली करण्यात आली आहे. मात्र, या मार्गावरील नयनरम्य केबल स्टेड ब्रिज आणि अत्याधुनिक बोगद्यांमध्ये सेल्फी, फोटो आणि रिल्स काढण्यासाठी वाहनचालक आपली वाहने थांबवत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) प्रवाशांना कडक इशारा दिला असून, नियम मोडणाऱ्यांवर मोठ्या दंडाची कारवाई केली जाणार आहे.

अपघाताचा धोका आणि सीसीटीव्हीची नजर द्रुतगती मार्गावर वाहने थांबवण्यास पूर्णपणे मनाई आहे. सेल्फी किंवा फोटोसाठी वाहन थांबवल्यास मागून येणाऱ्या वेगवान वाहनांमुळे भीषण अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कनेक्टिंग लिंकमधील दोन्ही बोगदे आणि पुलांवर २४x७ सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे विनाकारण वाहन थांबवणाऱ्यांवर कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

महामार्ग पोलिसांकडून वेग मर्यादा जाहीर प्रवासाचा वेग आणि सुरक्षितता राखण्यासाठी महामार्ग पोलिसांनी 'मिसिंग लिंक' प्रकल्पासाठी नवीन वेग मर्यादा निश्चित केली आहे:

Advertisement

बोगद्यात हलकी मोटार वाहने: ताशी १०० किमी वेग मर्यादा.

बस आणि इतर प्रवासी वाहने: ताशी ८० किमी वेग मर्यादा.

प्रशासनाचे आवाहन बेजबाबदार वर्तनामुळे स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी वाहनधारकांनी नियमांचे पालन करावे आणि रिल्स किंवा फोटोसाठी द्रुतगती मार्गावर कुठेही वाहने उभी करू नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

?s=20

Comments

No comments yet.