महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल... २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या....

Share:
Main Image
Last updated: 30-Apr-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ३० एप्रिल - राज्य शासनाने आज गृह विभागामार्फत पोलीस दलातील वरिष्ठ आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. एकूण २१ अधिकाऱ्यांच्या या बदल्यांमध्ये प्रामुख्याने जिल्हा पोलीस अधीक्षक आणि मुंबईतील पोलीस उप आयुक्त पदावरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची मुंबईत बदली झाली असून त्यांच्या जागी आता ठाणे ग्रामीणचे धोंडोपंत स्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  

प्रमुख जिल्ह्यांमधील बदल (जिल्हा पोलीस अधीक्षक):

नाव कोठून (विद्यमान पद) कोठे (नवीन नियुक्ती)

धोंडोपंत एस. स्वामी पोलीस अधीक्षक, ठाणे (ग्रामीण) पोलीस अधीक्षक, नाशिक (ग्रामीण)

मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक, चंद्रपूर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर

तेगबीर सिंह संधू अपर पोलीस अधीक्षक, मालेगाव पोलीस अधीक्षक, जालना

सिंगुरी विशाल आनंद पोलीस अधीक्षक, अमरावती (ग्रामीण) पोलीस अधीक्षक, धुळे

अश्विनी सानप पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पुणे पोलीस अधीक्षक, नंदुरबार

Advertisement

आयुष नोपानी अपर पोलीस अधीक्षक, जालना पोलीस अधीक्षक, चंद्रपूर

पंकज कुमावत अपर पोलीस अधीक्षक, अमरावती (ग्रा.) पोलीस अधीक्षक, परभणी

महत्त्वाच्या बदल्या आणि पदोन्नती:

नाशिक कनेक्शन: नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची आता मुंबई शहरात पोलीस उप आयुक्त म्हणून बदली झाली आहे. तर मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांची जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून पदोन्नती झाली आहे. परभणीचे अपर अधीक्षक सुरज गुंजाल यांची मालेगावच्या अपर अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  

सायबर सुरक्षा: जळगावचे पोलीस अधीक्षक अजय के. बन्सल यांची महाराष्ट्र राज्य सायबर सुरक्षा विभागात पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  

मुंबई पोलीस दलात वाढ: बाळासाहेब पाटील, संदीप घुगे, अनुराग जैन आणि गजानन राजमाने या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती मुंबई शहरात पोलीस उप आयुक्त म्हणून करण्यात आली आहे.  

पुणे अमली पदार्थ विरोधी पथक: अनुज मिलिंद तारे यांची पुणे येथील अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  

प्रशासकीय सूचना:

हा शासन आदेश महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम २२न मधील तरतुदींनुसार जारी करण्यात आला आहे. पोलीस महासंचालकांनी न्यायालयाचे आदेश, निवडणूक आचारसंहिता आणि कायदा-सुव्यवस्थेची स्थिती लक्षात घेऊन पुढील कार्यवाही करावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. गृह विभागाचे सह सचिव सुग्रीव धपाटे यांच्या डिजिटल स्वाक्षरीने हे आदेश निर्गमित झाले आहेत.

Comments

No comments yet.