पंचवटीत तरुणाची पाचव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या.. कारण ऐकून तुम्हीही बैचेन व्हाल...

Share:
Main Image
Last updated: 30-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ३० एप्रिल - पैशांच्या कारणातून कुटुंबात झालेल्या वादामुळे एका ३८ वर्षीय व्यक्तीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना पंचवटीतील ढिकलेनगर भागात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र संजय थोरात (वय ३८, रा. निर्माण उपवन, ढिकलेनगर, पंचवटी) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. मंगळवारी (दि. २८) रात्री देवेंद्र यांचा त्यांच्या कुटुंबीयांशी पैशांच्या विषयावरून वाद झाला होता. या वादामुळे ते प्रचंड तणावाखाली होते. याच नैराश्यातून बुधवारी मध्यरात्री त्यांनी राहत्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील गॅलरीतून खाली उडी घेतली.

रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच प्राणज्योत मालवली

Advertisement

उडी घेतल्याने देवेंद्र जमिनीवर आदळले आणि गंभीर जखमी झाले. घटनेचा आवाज होताच नातेवाईकांनी खाली धाव घेतली. मेव्हणे गौरव वायकुळ यांनी त्यांना तातडीने परिसरातील सुधर्म हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

पंचवटी पोलीस ठाण्याचे जमादार शेळके या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आर्थिक विवंचना किंवा घरगुती वादातून टोकाचे पाऊल उचलण्याच्या घटना वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

 

नाशिक : शहरात वाहनचोरीची मालिका सुरूच असून वेगवेगळ्या भागातून दोन मोटारसायकली चोरट्यांनी चोरून नेल्या. याबाबत सातपूर व पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मोटारसायकल चोरीची पहिली तक्रार संग्राम सुरेश चित्ते (रा.अश्विनी कॉलनी,सामनगावरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. चित्ते गेल्या मंगळवारी (दि.२१) दुपारच्या सुमारास गोदाघाटावर गेले होते. कपालेश्वर महादेव मंदिर परिसरात लावलेली त्यांची एमएच १५ एफजे ३२६९ मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार सोनार तपास करीत आहेत. दुसरी घटना त्र्यंबकरोडवरील पपया नर्सरी भागात घडली. कैलास विश्वनाथ कडाळे (रा.बंदावणे मळा,अशोकनगर) यांनी फिर्याद दिली आहे. कडाळे यांची एमएच १५ सीडब्ल्यू ३८३७ मोटारसायकल मंगळवारी (दि.२८) पपया नर्सरी परिसरातील सौभाग्य लॉन्स येथे पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार बेंडकुळे तपास करीत

Comments

No comments yet.