नाशिक, (प्रतिनिधी) २५ एप्रिल - नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. (सिटीलिंक) प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाढती गर्दी लक्षात घेता, सोमवार दि. २७ एप्रिल २०२६ पासून तीन नवीन बस मार्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये तपोवन ते अमृतानगर, नाशिकरोड ते बारदान फाटा आणि नाशिकरोड ते मखमलाबाद या मार्गांचा समावेश असून, यामुळे उपनगरातील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
१. मार्ग क्र. १०६ G : तपोवन ते अमृतानगर (दर १५ मिनिटांनी बस)
हा मार्ग पंचवटी, महामार्ग, लेखानगर, गामणे गार्डन, कृष्णाई नगर आणि सावंत चौक मार्गे धावेल. या मार्गावर प्रवाशांची संख्या लक्षात घेता, प्रशासनाने ५६ फेऱ्या (येण्या-जाण्याच्या प्रत्येकी २९) नियोजित केल्या आहेत.
वेळ: अमृतानगर ते तपोवन पहिली बस सकाळी ६:४५ वाजता, तर शेवटची बस रात्री ९:३० वाजता असेल.
वैशिष्ट्य: प्रवाशांना दर १५ मिनिटांनी या मार्गावर बस उपलब्ध होईल.
२. मार्ग क्र. २१९ : नाशिकरोड ते बारदान फाटा (दर अर्ध्या तासाला बस)
वडनेर, पाथर्डी फाटा, एकस्लो पॉइंट आणि सातपूर या औद्योगिक व रहिवासी क्षेत्राला जोडणारा हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या मार्गावर एकूण ४८ फेऱ्या होतील.
वेळ: नाशिकरोड डेपोतून सकाळी ६:०० वाजता पहिली बस सुटेल. बारदान फाट्यावरून नाशिकरोडकडे शेवटची बस रात्री ७:२० वाजता मार्गस्थ होईल.
वैशिष्ट्य: प्रत्येक ३० मिनिटांनी बस सेवा उपलब्ध असेल.
३. मार्ग क्र. ११४ : नाशिकरोड ते मखमलाबाद (जेलरोड मार्गे)
जेलरोड, नारायण बापू नगर, निलीगिरी बाग, आर.टी.ओ. कॉर्नर आणि म्हसरूळ या भागातील प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हा मार्ग सुरू करण्यात येत आहे. या मार्गावर ३० फेऱ्या होतील.
नियोजन: तपोवन ते मखमलाबाद आणि त्यानंतर मखमलाबाद ते नाशिकरोड अशा पद्धतीने या फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
वेळ: मखमलाबाद ते नाशिकरोड सकाळी ७:३० ते सायंकाळी ६:४५ पर्यंत बस उपलब्ध राहतील.
सिटीलिंकचे आवाहन:
"प्रवाशांची वाढती मागणी आणि होणारी गैरसोय लक्षात घेऊन आम्ही हे नवीन मार्ग सोमवारपासून कार्यान्वित करत आहोत. नाशिककरांनी खाजगी वाहनांचा वापर टाळून पर्यावरणपूरक आणि सुरक्षित अशा 'सिटीलिंक' बससेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा," असे आवाहन सिटीलिंक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
थोडक्यात वेळापत्रक असे