आमदार राहुल ढिकले यांच्या पत्नी आदिती ढिकले यांचे निधन... मुख्यमंत्री फडणवीस अंत्यदर्शन घेणार...

Share:
Main Image
Last updated: 25-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २५ एप्रिल - नाशिक पूर्व मतदारसंघाचे भाजप आमदार राहुल ढिकले यांच्या पत्नी आदिती राहुल ढिकले (वय ४१) यांचे शनिवारी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण नाशिक शहरासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी शोककळा पसरली आहे. मखमलाबाद येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सी. एस. पिंगळे यांच्या त्या कन्या होत.

नेमकी घटना काय?

आज (शनिवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक महत्त्वाचे मंत्री त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर होते. आमदार राहुल ढिकले हे सकाळपासूनच मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात सहभागी होते. याच दरम्यान, नाशिकमधील घरी असताना आदिती ढिकले यांच्या छातीत अचानक तीव्र कळ आली. त्यांना तातडीने उपचारासाठी सुयश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न निष्फळ ठरले आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

संकटकाळात बनल्या होत्या 'आधारवड'

Advertisement

आमदार राहुल ढिकले यांनी आपल्या आयुष्यात आलेला कठीण काळ आणि गंभीर आजारावर मात करताना मोठी झुंज दिली होती. या संघर्षात आदिती ढिकले यांनी त्यांना मोलाची साथ दिली होती. प्रत्येक संकटात खंबीरपणे पाठीशी उभे राहत त्यांनी कुटुंबाला आणि राहुल भाऊंना मानसिक बळ देण्याचे महान कार्य केले. त्यांच्या जाण्याने ढिकले आणि पिंगळे कुटुंबावर आभाळ कोसळले असून, एक भक्कम आधार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

राजकीय क्षेत्रावर शोककळा

वैशाली ढिकले यांच्या निधनाची बातमी समजताच त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला पुढील नियोजित कार्यक्रम आटोपता घेऊन तातडीने नाशिककडे धाव घेतली आहे. मुख्यमंत्री लवकरच ढिकले यांच्या निवासस्थानी पोहचून अंत्यदर्शन घेणार आहेत. त्यांच्या निधनामुळे नाशिकमधील सर्वपक्षीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

?s=20

Comments

No comments yet.