"होय, मी शिवीगाळ केली..."  व्हायरल क्लिपवर आमदार संजय  गायकवाड म्हणाले...

Share:
Main Image
Last updated: 23-Apr-2026

बुलढाणा, (प्रतिनिधी) २३ एप्रिल - शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, त्यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. या संदर्भात आमदार गायकवाड यांनी आपली बाजू मांडली असून, सदर क्लिप ही मूळ संभाषणातून काही शब्द वगळून आणि 'मोडून-तोडून' जाणीवपूर्वक प्रसारित करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

नेमके प्रकरण काय?
आमदार गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पत्नीला एका सार्वजनिक कार्यक्रमात एक पुस्तक भेट म्हणून मिळाले होते. हे पुस्तक वाचल्यानंतर त्यामध्ये मराठा समाजाच्या गौरवशाली इतिहासाची छेडछाड केल्याचे आणि एकेरी भाषेत उल्लेख असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. इतिहासाचे विकृतीकरण केल्यामुळे त्यांनी संबंधित प्रकाशकाला याबद्दल जाब विचारला होता.

Advertisement

मुजोरीमुळे दिला शिव्यांचा सराव
"इतिहासाचा अपमान केल्याप्रकरणी मी जेव्हा प्रकाशकाला विचारणा केली, तेव्हा त्याने नम्रता दाखवण्याऐवजी जातीचा उल्लेख करत मुजोरी केली. तो व्यक्ती वारंवार मला डिवचत होता. छत्रपतींच्या आणि मराठ्यांच्या इतिहासाबद्दल चुकीचे लिहिणाऱ्याची मुजोरी सहन न झाल्यामुळे रागाच्या भरात मी त्याला शिवीगाळ केली," असे स्पष्टीकरण गायकवाड यांनी दिले आहे.

विरोधकांचा डाव असल्याचा संशय
सोशल मीडियावर व्हायरल झालेली क्लिप ही संदर्भासह पूर्ण नसून, केवळ बदनामी करण्याच्या हेतूने ती संपादित करण्यात आली असल्याचेही गायकवाड यांनी म्हटले आहे. या स्पष्टीकरणानंतर आता संबंधित पुस्तक आणि प्रकाशकाबाबतच्या वादाला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे.

Comments

No comments yet.