वाहतूक कोंडीवरून फाडफाड इंग्रजीत बोलणाऱ्या त्या महिलेबद्दल गिरीश महाजन म्हणाले...

Share:
Main Image
Last updated: 22-Apr-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २२ एप्रिल - काल झालेल्या आंदोलनादरम्यान वाहतूक कोंडीवरून एका महिलेने मंत्री गिरीश महाजन यांच्याशी केलेल्या वादावादीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या संपूर्ण प्रकरणावर आता स्वतः मंत्री गिरीश महाजन यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून, त्या महिलेने वापरलेली भाषा आणि केलेले वर्तन अत्यंत चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नेमकं काय घडलं?
आंदोलनामुळे झालेली वाहतूक कोंडी आणि सामान्यांची होणारी गैरसोय यावर बोलताना महाजन म्हणाले की, "मोर्चामुळे थोड्या फार प्रमाणात वाहतूक कोंडी होते आणि सामान्यांना त्याचा त्रास होतो, हे आम्हाला मान्य आहे. मात्र, त्या वेळी तिथे उपस्थित असलेली एक महिला अत्यंत आक्षेपार्ह भाषेत बोलत होती. तिने केवळ माझ्याशीच नाही, तर तिथल्या पोलीस भगिनींसोबतही अत्यंत वाईट भाषेत संवाद साधला."

बाटली फेकून मारण्याचा प्रयत्न
गिरीश महाजन यांनी पुढे माहिती दिली की, त्या महिलेचा राग इतका अनावर झाला होता की तिने बाटली फेकून मारली. "मी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होतो. आम्ही १०-१५ मिनिटांत निघून जाऊ, असे मी त्यांना समजावून सांगत होतो. मात्र, त्यांनी ज्या भाषेचा वापर केला ते पूर्णपणे चुकीचे होते," असे महाजन यांनी स्पष्ट केले.

Advertisement

"यापुढे कोणाचीही अशी गैरसोय होणार नाही, याची आम्ही नक्कीच काळजी घेऊ. मात्र, सार्वजनिक ठिकाणी संवाद साधताना भाषेचे भान राखणे गरजेचे आहे." 
 — गिरीश महाजन, मंत्री.

पोलीस प्रशासनाकडून दखल?
पोलीस कर्मचाऱ्यांशीही गैरवर्तन झाल्यामुळे आता या प्रकरणी पोलीस प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, महाजन यांनी 'सामान्यांची गैरसोय होऊ नये हीच आमची प्राथमिकता असेल' असे आश्वासन देऊन या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.