नाशिक, (प्रतिनिधी) २१ एप्रिल - लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. या अत्याचारामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली असून, याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध बलात्कार आणि 'पोस्को' (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, आयुष बाबू राऊत (रा. म्हाडा बिल्डिंग, वडाळा गाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित आयुष याच्याशी तिचे सन २०२२ पासून प्रेमसंबंध होते. या काळात लग्नाचे आमिष दाखवून त्याने पीडितेचा विश्वास संपादन केला आणि तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले.
असा उघड झाला प्रकार
पीडित मुलगी काही दिवसांपूर्वी गर्भवती राहिल्याचे समोर आले. शारीरिक बदलांमुळे कुटुंबाला संशय आला आणि चौकशीअंती हा गंभीर प्रकार उघडकीस आला. मुलीने आपबिती सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने इंदिरानगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस तपास सुरू
या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात असून पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अंकोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास केला जात असून, संशयिताचा शोध सुरू आहे.
कायदेशीर बाजू: या प्रकरणात पिडीता अल्पवयीन असल्याने पोलिसांनी भारतीय दंड विधानातील बलात्काराच्या कलमांसह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्याची कलमे लावली आहेत. या कायद्यांतर्गत संशयिताला कठोर शिक्षेची तरतूद आहे.
नाशिक : गिरणीतून दळण घेवून घराकडे पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेले. ही घटना उपनगर येथील शांतीपार्क भागात घडली. या घटनेत ९० हजार रूपये किमतीच्या मंगळसुत्रावर चोरट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी पोलीस दप्तरी जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निता रमन शिंदे (रा.मिथीला बंगल्या जवळ शांती पार्क) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शिंदे सोमवारी (दि.२०) परिसरातील गिरणीत दळण दळण्यासाठी गेल्या होत्या. रात्री आठच्या सुमारास दळण घेवून त्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. सुयोग बिल्डींग समोरून त्या जात असतांना पाठीमागून दुचाकीवर डबलसिट आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळ््यातील सुमारे ९० हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र हिसकावून नेले. उपनिरीक्षक पवार करीत आहेत.