केंद्रीय मंत्री जेव्हा सरकारी रुग्णालयाला अचानक भेट देतात... काय आढळलं त्यांना?

Share:
Main Image
Last updated: 21-Apr-2026

बुलढाणा, (प्रतिनिधी) २१ एप्रिल - केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयाला अचानक भेट देऊन तेथे उपचार घेत असलेल्या गाजीपुर अपघातग्रस्त रूग्णाची आणि इतर रुग्णालयातील रुग्णांची भेट घेवून रुग्णसेवेबद्दल विचारपूस केली.

Advertisement

देवदर्शनाला जात असतांना मोताळा तालुक्यातील भविकांच्या गाडीचा उत्तर प्रदेशातील गाजीपुर नंदगज येथे 9 एप्रील रोजी अपघात झाला होता. या अपघात दोन महीला ठार झाल्या. तर 38 प्रवासी जखमी झाले होते. गाजीपुर येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर काही रुग्णांना सुट्टी देण्यात आली, तर काहींनी  बुलढाणा येथे उपचार करीता आणण्यात आले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. आज 20 एप्रील रोजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला अचानक भेट देऊन तेथील उपचार घेत असलेल्या  गाजीपुर अपघातग्रस्त निर्मलाबाई पाखरे आणि भागीरथी चौधरी यांची भेट घेऊन त्यांची चौकशी केली. मिळत असलेल्या वैद्यकीय सुविधेबद्दल माहिती जाणून घेतली. सोबतच  वार्ड क्रमांक 2 मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांसोबतही चर्चा केली.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार, अतिरिक्त जिल्हा शल्य डॉ. भागवत भुसारी उपस्थित होते. त्यानंतर रोहीणखेड येथील  अपघातात मृत्यूमुखी  पडलेल्या सरस्वताबाई पाखरे यांच्या निवासस्थांनी सांत्वनपर भेट दिली. याच गावातील जखमी भानुदास हुंबड आणि नलीनी हुंबंडच्या घरी भेट देऊन तब्बेतेची चौकशी केली.

Comments

No comments yet.