अनावश्यक खर्चाला फाटा... 'राष्ट्रवादी'चे नेते दिलीप खैरे यांच्या पुत्राचा मुंबईत असा झाला विवाह...

Share:
Main Image
Last updated: 21-Apr-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २१ एप्रिल - आजच्या काळात विवाह सोहळ्यांवर होणाऱ्या अवाढव्य खर्चाला फाटा देत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांचे सुपुत्र चि. तुषार आणि मुंबई येथील अक्षदा ठक्कर यांनी नोंदणी पद्धतीने (रजिस्टर मॅरेज) विवाह करून समाजासमोर एक नवा आदर्श उभा केला आहे. या सुसंस्कृत निर्णयाचे राजकीय आणि सामाजिक स्तरातून स्वागत होत आहे.

मंत्र्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
मुंबईत अत्यंत साधेपणाने हा विवाह सोहळा पार पडल्यानंतर, या नवदाम्पत्याने राज्याचे मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी छगन भुजबळ आणि त्यांच्या पत्नी यांनी पुष्पगुच्छ देऊन या जोडप्याचे स्वागत केले आणि त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

Advertisement

समाजासाठी प्रेरणादायी पाऊल
विवाह सोहळ्यातील डामडौल आणि अनावश्यक खर्च टाळून तुषार आणि अक्षदा यांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. "अत्यंत साध्या पद्धतीने विवाह करण्याचा या दोघांचा निर्णय समाजासाठी, विशेषतः तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे," अशा शब्दांत मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

मान्यवरांची उपस्थिती
या साध्या पण घरगुती स्वरूपाच्या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, अंबादास खैरे यांच्यासह खैरे आणि ठक्कर कुटुंबातील मोजके सदस्य उपस्थित होते. राजकीय क्षेत्रातील एका बड्या नेत्याच्या मुलाने अशा प्रकारे साधेपणाने विवाह केल्यामुळे सर्वत्र या निर्णयाची चर्चा रंगली आहे.

?s=20

Comments

No comments yet.