महिला छळ प्रकरण... नाशिक पोलिसांची कठोर कारवाई...

Share:
Main Image
Last updated: 18-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १८ एप्रिल - नाशिक शहरात घडलेल्या एका संवेदनशील घटनेच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर विविध अप्रमाणित व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी केवळ अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवावा व अफवांपासून दूर रहावे, असे आवाहन नाशिक शहर पोलिसांनी केले आहे.

महिला छळ प्रकरणात पोलिसांनी तात्काळ व कठोर कारवाई केली असून या कारवाईबाबत नागरिक, माध्यमे व विविध घटकांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल पोलिसांनी आभार व्यक्त केले आहेत. प्रभावी व नागरिकाभिमुख पोलिसिंगसाठी जनतेचा विश्वास आणि सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

?s=20

Advertisement

तपास प्रक्रियेदरम्यान संबंधित संस्थांकडून आवश्यक ते सहकार्य मिळत असून प्रकरणाचा तपास पुराव्यांच्या आधारे काटेकोरपणे सुरू आहे. तथापि, काही माध्यमांतून व सोशल मीडियावर अंदाजाधारित (स्पेक्युलेटेड) माहिती प्रसारित होत असल्याने तपासात अडथळे निर्माण होण्याची तसेच समाजात गैरसमज व भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

नागरिक, माध्यम प्रतिनिधी तसेच सोशल मीडिया वापरकर्त्यांनी कोणतीही माहिती पाहताना व शेअर करताना संयम व जबाबदारी बाळगावी. अप्रमाणित किंवा दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करू नये, कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी केवळ अधिकृत माध्यमांद्वारे पुष्टी झालेल्या माहितीलाच प्राधान्य द्यावे, असेही नाशिक शहर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

अधिकृत वेबसाईट 
https://nashikcitypolice.gov.in/

Comments

No comments yet.