महाबळेश्वरला आता ‘कोयना बॅकवॉटर फेस्टिव्हल’... अशी राहणार त्याची वैशिष्ट्ये...

Share:
Main Image
Last updated: 16-Apr-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १६ एप्रिल - कोयना जलाशयाचा विस्तीर्ण परिसर आणि येथील नैसर्गिक सौंदर्य जगभरातील पर्यटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी  आणि  महाबळेश्वर पर्यटन स्थळाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी ‘कोयना बॅकवॉटर फेस्टिव्हल आयोजित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री व  उपमुख्यमंत्री यांच्या आदेशान्वये या महोत्सवाचे पूर्ण नियोजन करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय व स्थानिक अधिका-यांनी या महोत्सवाचे  अंतिम स्वरूपाचा अहवाल सादर करावा असे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

Advertisement

सह्याद्री अतिथिगृहात कोयना बॅक वॉटर महोत्सव संदर्भात आयोजित बैठकीत मंत्री शंभूराज देसाई बोलत होते. यावेळी  पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, पर्यटन विभागाचे उपसचिव संतोष रोकडे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, पर्यटन विभागाचे सहसंचालक संतोष जाधव यावेळी उपस्थित होते.

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, पर्यटन विभागामार्फत या महोत्सवाचे नियोजन करण्यात येणार आहे. हा महोत्सव जागतिक त्याचप्रमाणे आंतरराज्य पर्यटकांना आकर्षित करण्यात येईल. या महोत्सवात  मॉर्निंग योगा, वॉटर स्पोर्ट्स, हेलीकाप्टर राइड, हेरिटेज वॉक, फ़ूड फेस्टिवल, बालमेळा, टेंट सिटी या उपक्रमाचे आयोजन करण्यात यावे. स्थानिक अधिकाऱ्यांनी महोत्सव करण्याची ठिकाणांची पाहणी करून नियोजन करावे. हा महोत्सव आता अधिक भव्य स्वरूपात होण्यासाठी डिसेंबरमध्ये या महोत्सवाचे नियोजन करावे. तापोळा व मुनावळे परिसरात हा महोत्सवाच्या उपक्रमांचे कोटेकारेपणे नियोजन करावे असे निर्देश, पर्यटन मंत्री देसाई यांनी दिले.

Comments

No comments yet.