नाशकात एकाच दिवशी तीन तरुणांच्या आत्महत्या, तर तीन अल्पवयीन मुले बेपत्ता...

Share:
Main Image
Last updated: 15-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १५ एप्रिल - शहरात मंगळवारी (दि.१४) अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आल्या आहेत. वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या तीन तरुणांनी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली, तर दुसऱ्या बाजूला तीन मुले संशयास्पदरित्या बेपत्ता झाल्याने खळबळ माजली आहे. या दोन्ही घटनांमुळे शहर परिसरात चिंतेचे वातावरण पसरले असून पोलीस या प्रकरणांचा कसून तपास करत आहेत.

Advertisement

१. आत्महत्येचे सत्र: कारणांचा शोध सुरू
एकाच दिवसात तीन तरुणांनी टोकाचे पाऊल उचलल्याने पंचवटी आणि नाशिकरोड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
फुलेनगर (पंचवटी): सुरज राजू सोनवणे (२१) याने मंगळवारी पहाटे राहत्या घरात पंख्याला साडी बांधून गळफास घेतला. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
वॉटर फिल्टर परिसर (पंचवटी): सोमनाथ नामदेव पोटींदे (२५) या तरुणाने दिंडोरी रोडवरील वॉटर फिल्टर टाकीच्या लोखंडी पाईपला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली.
चाडेगाव फाटा (नाशिकरोड): देविदास सुरेश गायकवाड (३६) याने आपल्या बेडरूममधील लोखंडी अँगलला गळफास घेतला. बिटको रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
या तिघांच्याही आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. हवालदार किरण सानप आणि हवालदार मोरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

२. बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले: पालकांमध्ये घबराट
शहरातून दोन मुली आणि एक मुलगा बेपत्ता झाल्याच्या तक्रारी म्हसरूळ आणि अंबड पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. मुलांना कुणीतरी फुस लावून पळवून नेल्याचा संशय पालकांनी व्यक्त केला आहे.
म्हसरूळ हद्दीत दोन घटना: रविवारी रात्री एक मुलगी घरातून बेपत्ता झाली, तर सोमवारी वैदूवाडी भागातील १५ वर्षीय मुलगा 'येतो' म्हणून घराबाहेर पडला तो अद्याप परतलेला नाही.
सिडको परिसर: महाराणा प्रताप चौक भागातील एक मुलगी रविवारपासून बेपत्ता असून, अंबड पोलिसात याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे.

Comments

No comments yet.