बहिणींमधील वादाचा रक्तरंजित शेवट... मेव्हण्याने चाकूचा धाक दाखवत कुटुंबाला बदडले...

Share:
Main Image
Last updated: 13-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १३ एप्रिल - दोन बहिणींमधील वादाचे पर्यावसान हाणामारीत झाल्याची धक्कादायक घटना म्हसरूळ लिंकरोड भागात घडली आहे. बहिणीच्या वादाचा राग मनात धरून मेव्हण्याने आपल्या साथीदारांसह मेव्हणीच्या घरात घुसून कुटुंबाला मारहाण केली, तसेच धारदार चाकूचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी छाया सुभाष पवार (रा. म्हाडा बिल्डिंग, म्हसरूळ लिंकरोड) आणि त्यांच्या बहिणीमध्ये काही कारणास्तव वाद झाला होता. या वादाचा राग छाया यांचा मेव्हणा संशयित अशोक ऊर्फ गणेश बाळू जाधव याच्या मनात होता. याच रागातून शनिवारी (दि. ११) रात्री गणेश जाधव याने आपल्या दोन साथीदारांसह छाया पवार यांचे घर गाठले.

Advertisement

घरात घुसून दहशत
संशयितांनी घरात प्रवेश करताच शिवीगाळ करत फिर्यादी छाया पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी संशयित गणेश जाधव याने धारदार चाकू काढून मेव्हणीला (फिर्यादी) जीवे ठार मारण्याची धमकी देऊन परिसरात दहशत निर्माण केली. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पवार कुटुंबीय भयभीत झाले आहेत.

यांच्यावर झाला गुन्हा दाखल:
छाया पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आडगाव पोलिसांनी खालील संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे:
१. अशोक ऊर्फ गणेश बाळू जाधव (रा. रोहिदासवाडा, कळवण)
२. मनोज प्रकाश गुजरे (रा. रामनगर, कळवण)
३. सौरभ भाऊसाहेब अहिरे (रा. मानूर, कळवण)

या घटनेचा पुढील तपास आडगाव पोलीस करत असून, घरगुती वादातून थेट चाकूचा वापर करून धमकावल्याच्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Comments

No comments yet.