लैंगिक शोषण, टार्गेट किलिंगसारखी रणनीती आणि ब्रेनवॉश... कॉर्पोरेट जिहाद बाबत धक्कादायक माहिती उजेडात...

Share:
Main Image
Last updated: 10-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १० एप्रिल - नाशिकमधील एका बहुराष्ट्रीय आयटी (MNC) कंपनीत केवळ लैंगिक शोषणच नाही, तर धार्मिक कट्टरता आणि धर्मांतराचे एक भयानक जाळे पसरल्याचे वास्तव समोर आले आहे. विशिष्ट समुदायातील तरुण-तरुणींनी संगनमताने इतर धर्मीय तरुणींना जाळ्यात ओढण्यासाठी व्हॉट्सॲपवर गुप्त गट (WhatsApp Groups) तयार केल्याची धक्कादायक माहिती विशेष तपास पथकाच्या (SIT) चौकशीत निष्पन्न झाली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे.

अशी होती 'कार्यपद्धती' (Modus Operandi)
एसआयटी तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी अत्यंत नियोजनबद्धरीतीने कार्यरत होते:
हनिमून ट्रॅप आणि फ्लर्टिंग: संशयित तरुण स्वतःला 'सिंगल' असल्याचे भासवून तरुणींशी जवळीक साधत. गोड बोलून, कौतुक करून आणि फ्लर्टिंग करून त्यांना जेवणाच्या बहाण्याने बाहेर नेले जात असे.
अमिषांचा वापर: कंपनीतील पदाचा गैरवापर करून "हवी तिथे बदली करून देतो" किंवा "रजा मिळवून देतो" अशी आमिषे दाखवून तरुणींना उपकृत केले जाई.
मानसिक छळ: ज्या तरुणींनी या आमिषांना किंवा जवळीक साधण्याच्या प्रयत्नांना दाद दिली नाही, त्यांना कामाच्या ठिकाणी इतका मानसिक त्रास दिला जाई की, कंटाळून अनेक तरुणींनी नोकरीचे राजीनामे दिले आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे 'ब्रेनवॉश'
या कटात केवळ तरुणच नव्हे, तर तरुणींचाही मोठा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. 'पुढचे लक्ष्य' कोणाला करायचे, हे ठरवण्यासाठी एक मुख्य ग्रुप होता. एकदा एखादी तरुणी जाळ्यात अडकली की, तिच्यासाठी पुन्हा एक स्वतंत्र व्हॉट्सॲप ग्रुप बनवला जात असे. या ग्रुपच्या माध्यमातून तिचे वैचारिक ब्रेनवॉश केले जात असल्याचा संशय पीडितांनी व्यक्त केला आहे.

Advertisement

नऊ गुन्हे दाखल; सहा आरोपी कोठडीत
नाशिक पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत नऊ गुन्हे नोंदवले आहेत. आसिफ अन्सारी, शफी शेख, रझा मेमन, तौसिफ अत्तार, शाहरूख कुरेशी आणि दानिश शेख हे सहा आरोपी सध्या 'एसआयटी'च्या कोठडीत आहेत. या प्रकरणातील मुख्य दुवा मानली जाणारी निदा खान अद्याप फरार असून पोलीस तिचा कसून शोध घेत आहेत.

भाजयुमो आक्रमक; कंपनी परिसरात तणाव
या प्रकरणाचे पडसाद राजकीय उमटू लागले आहेत. भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या वतीने संबंधित बहुराष्ट्रीय कंपनीच्या प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने करण्यात आली.
मागणी: दोषी कर्मचाऱ्यांसह त्यांना पाठीशी घालणाऱ्या कंपनी प्रशासनावर कडक कारवाई करावी.
पोलीस बंदोबस्त: आंदोलनामुळे निर्माण झालेली तणावाची परिस्थिती पाहता दंगा नियंत्रण पथक आणि पोलीस उपायुक्त मोनिका राऊत घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

"एका प्रतिष्ठित आयटी कंपनीत अशा प्रकारे संघटित गुन्हेगारी आणि धार्मिक कट्टरतेचे प्रकार घडणे ही नाशिकसाठी चिंतेची बाब आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सर्व सूत्रधारांना अटक करण्यात येईल."
— पोलीस तपास यंत्रणा, नाशिक.

Comments

No comments yet.