हिरावाडीत नातलगाकडून मायलेकांना बेदम मारहाण...  पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

Share:
Main Image
Last updated: 09-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ९ एप्रिल - शहरातील हिरावाडी परिसरात किरकोळ कारणावरून नातलगानेच मायलेकांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. ७) रात्री घडली. या हल्ल्यात महिलेसह तिची दोन मुले जखमी झाली असून, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

नेमकी घटना काय?
आशा विलास मिरजकर (३५, रा. भिकुसा मिलसमोर, हिरावाडी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशा मिरजकर यांचा नणंदचा मुलगा संशयित रोहित ज्ञानेश्वर पवार याने मंगळवारी रात्री विनाकारण फिर्यादीच्या घरासमोर येऊन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

वस्तूने केला प्रहार
मिरजकर आणि त्यांच्या मुलांनी घराबाहेर येऊन संशयिताला शिवीगाळ करण्याचे कारण विचारले आणि जाब विचारण्याचा प्रयत्न केला. याचा राग आल्याने संशयित रोहित याने तिघांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण सुरू असतानाच संशयिताने जवळ असलेल्या एका वस्तूने मायलेकांवर प्रहार केला. या हल्ल्यात आशा मिरजकर आणि त्यांची दोन्ही मुले जखमी झाली आहेत.
या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पंचवटी पोलिसांनी रोहित पवार याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास हवालदार संदीप सानप करत आहेत.

Comments

No comments yet.