नाशिक धान्य किरकोळ किराणा संघटनेने जिंकला क्रिकेट करंडक...

Share:
Main Image
Last updated: 06-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ६ एप्रिल  -  महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चरतर्फे आयोजित 'मासिआ व्यापारी क्रिकेट करंडक २०२६' चा थरार रविवार दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी मखमालाबाद येथील क्रेड्यांक मैदानावर उत्साहात संपन्न झाला.

नाशिक धान्य किरकोळ किराणा व्यापारी संघटना आणि कॉम्पुटर असोसिएशन, मोटर मालक कामगार वाहक संघटना आणि नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन या चार संघामध्ये उपांत्य सामने होऊन अंतिम सामन्यामध्ये नाशिक धान्य किरकोळ किराणा संघटनेने मोटर मालक कामगार वाहक संघटनेवर मात  करत  मासिआ व्यापारी क्रिकेट करंडक २०२६' जिंकला. महाराष्ट्र चेंबरचे पूर्वाध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या हस्ते विजेत्या  नाशिक धान्य किरकोळ किराणा संघटनेला  (किराणा किंग) 'मासिआ व्यापारी क्रिकेट करंडक २०२६' देण्यात आला.

याप्रसंगी व्यासपीठावर  महाराष्ट्र चेंबरचे पूर्वाध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष संजय सोनवणे, क्रिकेट स्पर्धा समितीचे चेअरमन सलीम बटाडा, भाजपा आरोग्य आघाडीचे पप्पू शेख, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी हेतल पटेल, को-चेअरमन भावेश मानेक, संजय राठी आणि कार्यकारिणी सदस्य सचिन शहा, सुनिता फाल्गुने,मिथिला कापडणीस, दिपाली चांडक, रतन पडवळ उपस्थित होते.  महाराष्ट्र चेंबरचे पूर्वाध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी स्पर्धेचा उद्देश सांगून सहभागी संघटनांचे, खेळाडूंचे, विजेत्या संघाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. उपाध्यक्ष संजय सोनवणे, क्रिकेट स्पर्धा समितीचे चेअरमन सलीम बटाडा, भाजपा आरोग्य आघाडीचे पप्पू शेख, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी हेतल पटेल, यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.

Advertisement

मोटर मालक कर्मचारी वाहक संघटना आणि हार्डवेअर अँड पेंट्स मर्चंट वेल्फेअर असोसिएशन, नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन आणि नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन, कॉम्प्युटर असोसिएशन आणि किराणा किंग, नासिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन आणि निमा, कॉम्प्युटर असोसिएशन आणि प्लायवूड मर्चंट असोसिएशन, नाशिक डिस्टिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन आणि निमा तसेच नाशिक धान्य किरकोळ किराणा व्यापारी संघटना आणि प्लायवूड मर्चंट असोसिएशन या संघांमध्ये दिवसभर झालेल्या विविध सामन्यात अतिशय चुरशीच्या लढती झाल्या. अनेकदा मैदानाच्या बाहेर चेंडू गेला. मीस फिल्डिंग, कॅच सुटणे, यासह उत्कृष्ट फील्डिंग व बॉलिंगही झाले चित्त थरारक झालेल्या सामने झाले.
व्यापार आणि उद्योगाच्या धावपळीच्या जीवनातून थोडा विरंगुळा मिळावा आणि सर्वांनी कुटुंबासह एकत्र येऊन आनंदाचे क्षण अनुभवावेत, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला नाशिकमधील व्यापारी वर्गातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघटना : १. नाशिक हार्डवेअर अँड पेन्ट्स मर्चंट असोसिएशन, २. नाशिक प्लायवुड मर्चंट्स अँड वेल्फेअर असोसिएशन, ३. नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन, ४. नाशिक धान्य किराणा किरकोळ व्यापारी संघटना, ५. नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन, ६. नाशिक कम्प्युटर असोसिएशन, ७.  मोटर मालक-कामगार संघटना, ८. निमा (NIMA), ९. आयमा (AIMA). या स्पर्धेसाठी 'संकल्प लॅण्डमार्क'चे प्रायोजकत्व लाभले असून, खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी 'सहयाद्री हॉस्पिटल'तर्फे मैदानावर तातडीची आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्रीन वूड कॅफे श्रध्दा बोरा-जैन यांचे अल्पोपहारासाठी सहकार्य लाभले आहे.

सत्यजित महाजन कल्पेश लोया, निमा अध्यक्ष आशिष नहार नाशिक धान्य किराणा किरकोळ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संतोष राय उपाध्यक्ष प्रभाकर गाडे माजी अध्यक्ष महेंद्र भाई पटेल सुरेश मंत्री, लाईव्ह मर्चंट असोसिएशनचे भवाण साखला,  कॉम्प्युटर असोसिएशनचे राजेश भावसार, शरद मिश्रा, विनोद शर्मा, बजरंग शर्मा आदी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह सर्व व्यापारी व उद्योजकांना या स्पर्धेचा आनंद घेतला. स्पर्धा यशस्वीतेसाठी सचिन पाटील, रिझवान शेख, प्रल्हाद सुर्यवंशी, अविनाश पाठक, सचिन जाधव यांनी परिश्रम घेतले.

Comments

No comments yet.