कार झाडावर आदळून २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू... गंगापूर रोडवरील अपघात...

Share:
Main Image
Last updated: 05-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ५ एप्रिल -  येथील गोदावरी नदीच्या पुलावर कारचा भीषण अपघात होऊन एका २४ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुसाट वेगात असलेली कार झाडावर आदळल्याने हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, शंतनू जयंत बुऱ्हाडे (वय २४, रा. फ्लॅट नं. २, दिपज्योती अपार्टमेंट, धनराजनगर, जेलरोड, नाशिक रोड) हा शनिवारी (दि. ४) रात्री ८:३० वाजेच्या सुमारास आपली कार (क्र. MH 46 Z 0067) घेऊन गिरणारे कडून नाशिकच्या दिशेने येत होता. गोदावरी नदीच्या पुलावर कार आली असता, हॉटेल गंमत जंमत जवळ शंतनूचे कारवरील नियंत्रण सुटले. यावेळी कार रस्त्याखाली उतरून कडेला असलेल्या झाडावर जाऊन जोरात आदळली.

Advertisement

या अपघातात शंतनूच्या डोक्याला पाठीमागून गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने तुषार विलास क्षत्रिय (रा. म्हसरूळ) यांनी जिल्हा रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल केले. मात्र, रात्री १०:३५ वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे जेलरोड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

Comments

No comments yet.