स्मार्टफोन आता बनला अधिक 'इंटेलिजंट'... सॅमसंगच्या गॅलेक्सी ए-सिरीजचे लाँचिंग...

Share:
Main Image
Last updated: 02-Apr-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २ एप्रिल - स्मार्टफोन तंत्रज्ञानातील जागतिक दिग्गज सॅमसंगने आपली लोकप्रिय 'ए' श्रेणी अधिक शक्तीशाली करत गॅलेक्सी ए५७ ५जी (Galaxy A57 5G) आणि गॅलेक्सी ए३७ ५जी (Galaxy A37 5G) हे दोन नवीन मॉडेल्स भारतीय बाजारपेठेत लाँच केले आहेत. 'ऑसम इंटेलिजन्स' या संकल्पनेखाली या फोनमध्ये प्रगत एआय (AI) फीचर्स, वेगवान प्रोसेसर आणि उत्कृष्ट फोटोग्राफी तंत्रज्ञानाचा मेळ घालण्यात आला आहे.

आता भाषेचा अडथळा दूर
या नवीन उपकरणांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे इन-बिल्ट ट्रान्सलेशन आणि ट्रान्स्क्रिप्शन. भारतात इंग्रजीसह हिंदी आणि गुजराती भाषांमध्ये हे फिचर उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे व्हॉईस मेसेजेसचे रिअल-टाइममध्ये मजकुरात रूपांतर आणि भाषांतर करणे शक्य होणार आहे. तसेच, गोंगाटाच्या ठिकाणी स्पष्ट आवाजासाठी 'व्हॉईस फोकस' आणि कॉल्स दरम्यान 'कॉल कॅप्शन्स'ची सुविधा देण्यात आली आहे.

डायरेक्ट व्हॉईसमेल आणि प्रगत सुरक्षा
या फोनमध्ये प्रथमच 'डायरेक्ट व्हॉईसमेल' हे फिचर देण्यात आले आहे. तुम्ही कॉल उचलला नाही, तर कॉलरचा संदेश १०० टक्के अचूकतेसह एआयद्वारे ट्रान्स्क्राइब केला जाईल. विशेष म्हणजे, हे सर्व संदेश क्लाउडऐवजी थेट डिव्हाइसवरच सुरक्षितपणे स्टोअर केले जातात, ज्यामुळे वापरकर्त्याची गोपनीयता जपली जाते.

Advertisement

हार्डवेअर आणि एआयची जुगलबंदी
सॅमसंगने या फोनमध्ये प्रोसेसरवर विशेष काम केले आहे:
गॅलेक्सी ए५७ ५जी: यामध्ये एक्झिनॉस १६८० प्रोसेसर असून, एनपीयू (NPU) कार्यक्षमता ३३ टक्क्यांनी वाढली आहे.
गॅलेक्सी ए३७ ५जी: हा फोन एक्झिनॉस १४८० वर चालतो, ज्याची एनपीयू कार्यक्षमता मागील जनरेशनच्या तुलनेत चक्क १६२ टक्क्यांनी अधिक आहे.
यामुळे इमेज प्रोसेसिंग आणि व्हिज्युअल सर्च अत्यंत वेगवान होणार आहे.

स्मार्ट कॅमेरा आणि 'वन यूआय ८.५'
फोटोग्राफीसाठी एआय समर्थित 'ऑब्जेक्ट इरेजर' आणि 'बेस्ट फेस' यांसारखी टूल्स देण्यात आली आहेत. 'वन यूआय ८.५' मुळे युजर्सना बिक्सबी, जेमिनी आणि परप्लेक्सिटी यांसारख्या मल्टि-असिस्टंटमधून निवड करण्याची मुभा मिळते. तसेच, गोपनीयतेसाठी 'एआय प्रायव्हसी अलर्ट' हे विशेष फिचरही यामध्ये समाविष्ट आहे.

ठळक वैशिष्ट्ये:
सर्कल टू सर्च: स्क्रीनवरील कोणत्याही गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी फक्त गोल करा.
रीअल-टाइम ट्रान्स्क्रिप्शन: विमानतळ किंवा मेट्रोसारख्या गजबजलेल्या ठिकाणीही कॉल संवाद वाचणे शक्य.
ऑटो इमेज एन्हांसमेंट: नैसर्गिक स्किन टोन आणि सुस्पष्ट फोटोंसाठी आपोआप सुधारणा.

दैनिक वापरामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी गॅलेक्सीची ही नवीन श्रेणी एक परिपूर्ण पर्याय ठरणार आहे.

Comments

No comments yet.