नाशिक, (प्रतिनिधी) ३१ मार्च - शहरात सध्या सुरू असलेली विविध रस्त्यांची कामे आणि त्यामुळे उद्भवणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार ‘सिटीलिंक’ प्रशासनाने अनेक बस मार्गांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात बदल केले आहेत. प्रामुख्याने नाशिकरोड आणि पाथर्डी परिसरातील मार्गांवर याचा परिणाम होणार असून, प्रवाशांनी प्रवासापूर्वी नवे मार्ग समजून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
असे असतील बदललेले मार्ग:
१) नाशिकरोड ते शालीमार मार्ग:
मार्ग क्रमांक २०१, २०२, २०३, २०७, २०८, २१०, २११, २३१, २३६, २४३, २४२, २४७, २५१, २६०, २६३, २६४, २६६, २९८, १२९, १३०, १४६, १४८ व १६६ या क्रमांकाच्या बसेस आता नवीन मार्गाने धावतील.
सुधारित मार्ग: नाशिकरोड येथून सुटल्यानंतर या बसेस आंबेडकर नगर, विजय ममता सिग्नल, अशोका मार्ग, भारतनगर, साईनाथ नगर, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक, इंदिरानगर बोगदा, महामार्ग, मुंबई नाका, उर्दू शाळा, गंजमाळ, शालीमार या मार्गे जातील. परतीचा प्रवासदेखील याच मार्गाने होईल.
२) पाथर्डी व टाकळी मार्ग:
मार्ग क्रमांक २५९ आणि १०४ या बसेसच्या मार्गातही बदल करण्यात आला आहे.
सुधारित मार्ग: या बसेस पाथर्डी गाव आणि टाकळीकडे जाताना उर्दू शाळा, आयेशा नगर, नागजी मार्गे मार्गस्थ होतील.
प्रशासनाचे आवाहन
पोलीस प्रशासनाच्या पुढील सूचना प्राप्त होईपर्यंत हे बदल लागू राहतील. ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी प्रवाशांनी या बदलांची नोंद घ्यावी. मार्गांबाबत अधिक माहिती हवी असल्यास प्रवाशांनी ८५३००५७२२२ किंवा ८५३००६७२२२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सिटीलिंक प्रशासनाने केले आहे.