महिला कुस्ती स्पर्धेसाठी सरकार दरवर्षी देणार इतक्या लाखांचा निधी... मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा...

Share:
Main Image
Last updated: 31-Mar-2026

सोलापूर, (प्रतिनिधी) ३१ मार्च - हरीभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात चौथी महिला महाराष्ट्र केसरी व वरिष्ठ गट महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा तसेच विविध गटातील पुरुष कुस्ती स्पर्धेसाठी 25 लाखांचा निधी जाहीर केला. तर पुढील वर्षीपासून महिला कुस्ती स्पर्धेसाठी 50 लाखाचा निधी देण्याबाबत मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे प्रस्ताव देण्यात येणार असल्याचे सांगून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महिला कुस्ती स्पर्धेला शासनाचा भक्कम पाठिंबा असल्याचे सांगितले.

हरीभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात आयोजित महिला महाराष्ट्र केसरी व वरिष्ठ गट महिला राज्यस्तरीय अजिंक्य स्पर्धा कुस्ती स्पर्धेच्या समारोप प्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे बोलत होते.  यावेळी आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी, सागर कल्याणशेट्टी, नगरसेविका रोहिणी तडवळकर, सुधा मोरे, अक्कलकोट अन्नछत्र ट्रस्टचे अध्यक्ष जन्मेजय राजे भोसले, स्वाती साखरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

पालकमंत्री गोरे म्हणाले की, कैलासवासी सिद्धाराम साखरे यांच्या स्मरणार्थ आयोजित ही कुस्ती स्पर्धा महिलांच्या कुस्ती क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. महाराष्ट्रातील रणरागिनींना राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देण्याचे कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून होणार आहे. कुस्तीपटू गीता व बबीता फौगाट यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल केले असून त्यांच्याप्रमाणे महाराष्ट्रातील महिला खेळाडूही पुढे येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

स्पर्धेतील अंतिम सामन्यात कोल्हापूरच्या अमृता पुजारी यांनी हिंदकेसरी किताब पटकावला. या स्पर्धेत मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या हिब्बारे यांनी केले.

Comments

No comments yet.