येवला प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात येवला टायगरचा शानदार विजय... येवला फायटर्सकडून येवला टायगरला ७९ धावांचे लक्ष्य... शेवटच्या चेंडूवर विजयी षटकार

Share:
Main Image
Last updated: 30-Mar-2026

येवला, (प्रतिनिधी) ३० मार्च - येवला प्रीमियर लीग (YPL) स्पर्धेचा आज उत्साहात शुभारंभ झाला. या स्पर्धेतील पहिल्याच दिवशी खेळविण्यात आलेला येवला टायगर्स विरुद्ध येवला फायटर्स हा सामना अत्यंत रंगतदार आणि चुरशीचा ठरला. येवला फायटर्स संघाने येवला टायगर संघाला ६ षटकांत ७९ धावांचे लक्ष्य दिले. या सामन्यात येवला फायटर ने प्रथम फलंदाजी करत ६ षटकांत ४ बाद ७८ धावा केल्या. या लक्षाचा पाठलाग करत प्रतिउत्तरात येवला टायगर्स संघाने ६ षटकांत ६ बाद ७९ धावा करत सामना जिंकला. विशेष म्हणजे येवला टायगर्स या संघाला शेवटच्या १ बॉल मध्ये सहा धावांची गरज होती. यावेळी शेवटच्या बॉलवर षटकार मारत येवला टायगर संघाने विजय मिळविला.

या सामन्यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले व सामन्याचा आनंद लुटला. यावेळी नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, शहराध्यक्ष दत्ता निकम, माजी जिल्हा परिषद सभापती संजय बनकर, नगरपालिकेचे गटनेते दिपक लोणारी, नगरसेवक प्रवीण बनकर, जावेद लखपती समन्वयक नितीन गायकवाड, डॉ.चंद्रशेखर क्षत्रिय, राजेश भांडगे, तुळशीराम कोकाटे, भाऊसाहेब धनवटे, सुमित थोरात, भूषण लाघवे, राकेश कुंभारे, राजेंद्र पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ईशान शेख याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच पराभूत संघातील सोमनाथ दिघे यांना बेस्ट स्ट्रायकर म्हणून सन्मानित करण्यात आले.

स्पर्धेच्या पहिल्याच सामन्याने प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून पुढील सामनेही तितकेच रोमांचक होताना दिसत आहे.

Comments

No comments yet.