भुजबळ ब्रिगेड आयोजित येवला प्रीमियर लीगचे दिमाखात उद्घाटन... ‘सारेगमप’ फेम श्वेता दांडेकर यांच्या सुरेल गाण्यांवर थिरकले येवलेकर....

Share:
Main Image
Last updated: 30-Mar-2026

येवला, (प्रतिनिधी) ३० मार्च - येवला ही केवळ ऐतिहासिक, सांस्कृतिक किंवा राजकीय ओळख असलेली भूमी नाही, तर प्रतिभावान युवकांची भूमीआहे. येथे ऊर्जा आहे, क्षमता आहे, जिद्द आहे आणि काहीतरी मोठं करण्याची ताकद आहे. फक्त त्या ताकदीला योग्य व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. येवला प्रीमियर लीग ही स्पर्धा म्हणजे त्या व्यासपीठाची सुरुवात आहे. यातून येवल्याच्या क्रीडा संस्कृतीला महत्वाच व्यासपीठ मिळेल असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले.

येवल्यातील क्रीडा संस्कृतीला नवे बळ देणाऱ्या आणि युवा पिढीला प्रोत्साहन देणाऱ्या भुजबळ ब्रिगेड आयोजित ‘येवला प्रीमियर लीग’या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे गौशाळा मैदान, येवला येथे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते उद्दघाटन करण्यात आले. यावेळी ‘सारेगमप’ फेम गायिका श्वेता दांडेकर यांच्या सुरेल गायनाने हा उद्घाटन सोहळा दिमाखदार ठरला.

यावेळी डॉ.शेफाली भुजबळ, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, ज्येष्ठ नेते अरुण थोरात, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, संभाजी पवार, शहराध्यक्ष दत्ता निकम,  माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, बंडू क्षीरसागर, माजी जिल्हा परिषद सभापती संजय बनकर, उपनगराध्यक्षा पुष्पा गायकवाड, येवला नगरपालिकेचे गटनेते दिपक लोणारी, नगरसेवक प्रवीण बनकर, नगरसेवक गोटू मांजरे, नगरसेवक पारूल गुजराथी, नगरसेवक अमजद शेख, जावेद लखपती, ब्रम्हकुमारी नीता दिदी, किसानकाका धनगे, सनी पटणी, तानाजी आंधळे, रतन बोरनारे, राजेंद्र भांडगे, प्रमोद सस्कर, सचिन कळमकर, डॉ.चंद्रशेखर क्षत्रिय, मच्छिंद्र थोरात, मकरंद सोनवणे, नाना लहरे, निसार शेख, गुड्डू जावळे, दत्ता रायते, साहेबराव आहेर, बाळासाहेब पुंड, समाधान जेजुरकर, पांडुरंग राऊत, नवनाथ काळे, बाळासाहेब पिंपरकर, मनोज रंधे, नितीन गायकवाड, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे,  सुहास भांबारे, मुश्ताक शेख, राजेंद्र पवार, संजय पगार, संतोष खैरनार, भगवान ठोंबरे, दीपक गायकवाड, सचिन सोनवणे, भूषण लाघवे, पार्थ कासार, सुमित थोरात,अविनाश कुक्कर,  यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व येवलेकर बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, अनेक दिवसांपासून युवकांची अशी अपेक्षा होती की,येवल्यात दर्जेदार, मोठ्या प्रमाणात, आकर्षक आणि प्रेरणादायी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन व्हावे. त्या मागणीची दखल घेत, भुजबळ ब्रिगेडच्या माध्यमातून ही स्पर्धा आज वास्तवात उतरली आहे. हे केवळ आयोजन नाही,तर युवकांच्या विश्वासाला दिलेले उत्तर आहे. क्रिकेट असो, कबड्डी असो, फुटबॉल असो किंवा कोणताही खेळ असो. खेळ हा फक्त मनोरंजनाचा विषय नसतो, तर तो व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया असतो. खेळ माणसाला शिस्त शिकवतो, संघर्ष शिकवतो, अपयश पचवायला शिकवतो आणि पुन्हा उभं राहण्याची हिंमत देतो. खेळाच्या माध्यमातून युवकांमध्ये आरोग्यदायी स्पर्धा, नेतृत्वगुण, एकी, नियोजन, मानसिक ताकद आणि जबाबदारीची भावना निर्माण होते.आज ही सुरुवात असून पुढील काळात ही स्पर्धा अधिक मोठ्या उंचीवर जाईल असे त्यांनी सांगितले.

क्रिकेटचा थरार आणि सुरांचा नजराणा,येवलेकरांनी लुटला दुहेरी आनंद
‘येवला प्रीमियर लीग’च्या उद्घाटन सोहळ्याला क्रीडा आणि कलेचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. या भव्य स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला‘सारेगमप’ फेम प्रसिद्ध गायिका श्वेता दांडेकर आपल्या सुरेल गायनाने चार चाँद लावले. एकीकडे मैदानावर क्रिकेटचा थरार, जल्लोष, चौकार-षटकारांचा पाऊस आणि दुसरीकडे श्वेता दांडेकर यांच्या मधुर आवाजातील सुरांची जादू अशा दुहेरी आनंदाचा अविस्मरणीय अनुभव येवलेकरांना या सोहळ्यात घेतला. 

स्पर्धेसाठी अशी आहे विशेष व्यवस्था
- ३ हजार प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था
- एकावेळी ६ हजारांहून अधिक नागरिक सामना पाहू शकतील अशी क्षमता
- मैदानावर १० पार लाईटची व्यवस्था
- डे-नाईट सामने पाहण्यासाठी अत्याधुनिक प्रकाशयोजना
- खेळाडू, पंच, आयोजक आणि प्रेक्षकांसाठी सुयोग्य नियोजन

Advertisement

महाराष्ट्रात प्रथमच ‘पाटा विकेट – बोथ एंड डे-नाईट’सामन्यांचा प्रयोग
येवला प्रीमियर लीग या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘पाटा विकेट बोथ एंड डे-नाईट’ सामन्यांचा महाराष्ट्रात प्रथमच येवल्यात प्रयोग करण्यात येत आहे. त्यामुळे या स्पर्धेचे आकर्षण केवळ येवला तालुक्यापुरते मर्यादित न राहता, संपूर्ण जिल्हा आणि राज्यातील क्रिकेटप्रेमींसाठीही हे एक वेगळे आकर्षण ठरणार आहे. नवीन तांत्रिक पद्धती, प्रकाशझोतातील सामने आणि स्पर्धेचे व्यावसायिक स्वरूप यामुळे ‘येवला प्रीमियर लीग’ ही केवळ स्पर्धा नसून एक संस्मरणीय क्रीडा महोत्सव ठरणार आहे.
या उद्दघाटन प्रसंगी लिजेंट किशोर माळी विरुद्ध मास्टर राजू पवार या दोन संघांमधील सामना खेळवला गेला. यावेळी क्रिकेटप्रेमींनी मैदानावर थरार,जल्लोष आणि क्रीडा रसिकांनी  उत्साह अनुभवायला मिळाला. या उद्दघाटन प्रसंगी माजी खासदार समीर भुजबळ यांनी फटकेबाजी केली.

आकर्षक बक्षिसांची रेलचेल
‘येवला प्रीमियर लीग’मध्ये सहभागी होणाऱ्या संघांसाठी आणि खेळाडूंसाठी आयोजकांनी अत्यंत आकर्षक बक्षिसांची घोषणा केली आहे.

*स्पर्धेतील बक्षिसे : *
-प्रथम बक्षीस : ₹ १,११,०००/-
-द्वितीय बक्षीस : ₹ ७७,७७७/-
-तृतीय बक्षीस : ₹ ५५,५५५/-
-चतुर्थ बक्षीस : ₹ ३३,३३३/-

याशिवाय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना विविध वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

‘मॅन ऑफ द सिरीज’ला बाईकचे आकर्षक बक्षीस
या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूस म्हणजेच ‘मॅन ऑफ द सिरीज’विजेत्यास बाईक हे विशेष आणि आकर्षक बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, सामनावीर अशा विविध गटांतही वैयक्तिक सन्मान देण्यात येणार असल्याने खेळाडूंमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.

महिलांसाठी दररोज प्रश्नमंजुषा,विजेत्यांना पैठणी भेट
‘येवला प्रीमियर लीग’चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महिलांसाठी दररोज विशेष प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाद्वारे महिलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग वाढविण्याचा आयोजकांचा प्रयत्न असून,विजेत्या महिलांना पैठणी भेट देण्यात येणार आहे. यामुळे ही स्पर्धा केवळ क्रिकेटपुरती मर्यादित न राहता,संपूर्ण कुटुंबासाठी एक आनंदोत्सव ठरणार आहे.

येवला प्रीमियर लीग मध्ये एकूण १६ संघांचा समावेश
येवला मतदारसंघातील सर्व आठ गट व येवला शहर यातून एकूण १६ संघांची निवड या स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.
१.येवला टायगर्स 
२.येवला फायटर्स
३.येवला मास्टर्स 
४.येवला ब्लास्टर्स 
५.मावळा चेंडूफळी 
६.एव्हरग्रीन ११
७.सह्याद्री वॉरियर पाटोदा 
८.लासलगाव चॅलेंजर्स
९.अंदरसूल स्ट्रायकर्स 
१०.राजापूर अवेंजर्स
११.मुखेड ग्लॅडिएटर
१२.सनरायजर्स नगरसूल
१३.विचूर रेंजर्स 
१४.देवगाव रॉकर्स 
१५.गुडमॉर्निंग ४०+
१६.डॉक्टर्स ३६५ 

सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण
‘येवला प्रीमियर लीग २०२६’मधील सर्व सामने ७० टी - ७० टी मुंबई यांच्या वतीने विशेष चार कॅमेऱ्यांच्या साहाय्याने अत्यंत दर्जेदार पद्धतीने युट्यूबवर थेट प्रक्षेपित करण्यात येत आहेत. यामुळे येवल्यात प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकणाऱ्या क्रीडाप्रेमींनाही घरबसल्या स्पर्धेतील प्रत्येक क्षण अनुभवता येत आहे. येवल्यासह महाराष्ट्र, देश आणि जगभरातील नागरिकांना या भव्य क्रिकेट स्पर्धेचा थरार लाईव्ह पाहण्याची संधी मिळाली असून, स्पर्धेची व्याप्ती अधिक व्यापक होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून क्रिकेटचा थरार, मैदानावरील जल्लोष आणि प्रत्येक सामन्याची रोमांचकता थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा आयोजकांचा हा विशेष उपक्रम ठरत आहे.

Comments

No comments yet.