बिल्डरांची संघटना असलेल्या नरेडको नाशिकची नूतन कार्यकारिणी जाहीर... बघा, कुणाकुणाला मिळाली संधी...

Share:
Main Image
Last updated: 27-Mar-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २७ मार्च - नरेडको नाशिकची सर्वसाधारण सभा दि. २५ मार्च २०२६ रोजी गेटवे (ताज), नाशिक येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेत नरेडको नाशिकच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून अध्यक्षपदी शंतनू देशपांडे तर मानद सचिवपदी भाविक ठक्कर, उपाध्यक्ष म्हणून उदय शाह, मरजयान पटेल व खजिनदारपदी भूषण महाजन यांची निवड करण्यात आली.

या कार्यक्रमास नरेडकोचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजन बांदेलकर, नरेडको महाराष्ट्र अध्यक्ष प्रशांत शर्मा, नरेडको महाराष्ट्राचे नवनिर्वाचित अध्यक्ष कमलेश ठाकूर, तसेच नरेडको महाराष्ट्र उपाध्यक्ष जयेश ठक्कर (नाशिक), हितेश ठक्कर (मुंबई), घनश्याम ढोकणे (नागपूर), राजेंद्र पाटे (पुणे) उपस्थित होते. तसेच सहसचिव पंकज कोठारी (अकोला), अरविंद खबाळे (कराड) आणि दिनेश दोषी (रायगड) यांच्यासह नरेडको विदर्भ अध्यक्ष कुणाल पडोळे यांची उपस्थिती लाभली. यावेळी नाशिकच्या प्रथम नागरिक महापौर हिमगौरी आडके, या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

Advertisement

सभेदरम्यान नरेडको नेक्स्टजेन (२०२६–२८) कार्यकारिणीची निवड प्रक्रिया देखील पार पडली. नेक्स्टजेन (युवा) अध्यक्षपदी रुचिक शिरोडे व नेक्स्टजेन (युवा) सचिवपदी विशाल कोठावदे तसेच  युवा कार्यकारिणी यांची घोषणा करण्यात आली. यावेळी विद्यमान अध्यक्ष सुनील गवादे यांनी आपल्या दोन वर्षांच्या कार्यकाळाचा आढावा सादर करताना होमेथॉन, जळगाव प्रॉपर्टी एक्स्पो, VIBE (खोपोली) सत्र, विविध सेमिनार-कार्यशाळा, चर्चासत्रे तसेच स्थानिक पातळीवर शासकीय विभागांशी केलेल्या समन्वयात्मक पाठपुराव्याचा उल्लेख केला.

नूतन अध्यक्ष शंतनू देशपांडे यांनी सदस्यांना भेडसावणाऱ्या प्रमुख प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून संघटनेचे काम अधिक गतिमान आणि परिणामकारक करण्याचा निर्धार व्यक्त केला.
नरेडको नाशिकचे नूतन खजिनदार भूषण महाजन यांनी लवकरच नरेडको नाशिकचे कार्यालय नाथसिता येवलेकर कॉम्प्लेक्स, कॉलेज रोड येथील स्वमालकीच्या प्रशस्त जागेत स्थलांतरित होणार असल्याची माहिती दिली.
निवडणूक प्रक्रियेचे कामकाज ज्येष्ठ सदस्य जयेश ठक्कर, अविनाश शिरोडे आणि अभय तातेड यांनी पाहिले. नूतन कार्यकारिणी १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२८ या कालावधीत कार्यभार सांभाळणार आहे.

Comments

No comments yet.