नाशिक म्हाडा घोटाळा विधिमंडळात गाजला... सरकार म्हणाले...

Share:
Main Image
Last updated: 24-Mar-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २४ मार्च - सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील प्रकरणात १९७ आरोपींची नावे निष्पन्न झाली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास प्राधान्याने करण्यात येत असून, तपासाच्या अनुषंगाने पुढील आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य प्रवीण दरेकर यांनी प्रश्न उपस्थित केला.

Advertisement

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, महानगरपालिका क्षेत्रातील चार हजार चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्राच्या गृहप्रकल्पांमध्ये २० टक्के सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. नाशिक येथे गृहनिर्माणाच्या तरतुदीनुसार म्हाडाच्या हिश्श्यातील सदनिका आणि भूखंड देण्यास काही विकासकांनी विरोध केला. याबाबत महसूल विभागाचा अहवाल गृहनिर्माण विभागाकडे प्राप्त झाला असून, त्यानुसार संबंधित आरोपींची नावे समोर आली आहेत. या संदर्भात नाशिकचे पोलीस आयुक्त यांच्याशी चर्चा करण्यात आली असून संबंधित आरोपींची पडताळणी, त्यांच्यावर लावण्यात आलेल्या कलमानुसार अटक प्रक्रिया आणि इतर सर्व बाबींना सर्वोच्च प्राधान्याने हाताळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.