सॅमसंगचा धमाका! तगडी बॅटरी, AI फीचर्स... 'गॅलेक्सी M17e 5G' भारतात लाँच...

Share:
Main Image
Last updated: 21-Mar-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २१ मार्च - भारतातील आघाडीची ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड 'सॅमसंग'ने आपल्या लोकप्रिय 'M' सिरीजमधील नवा विस्तार करत 'गॅलेक्सी M17e 5G' स्मार्टफोन बुधवारी लाँच केला. अत्यंत किफायतशीर किंमत आणि प्रीमियम फीचर्सचे मिश्रण असलेला हा फोन विशेषतः तरुण पिढीच्या (Gen Z) गरजा लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आला आहे.

किंमत आणि उपलब्धता
या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत १३,९९९ रुपये असून, हा फोन २० मार्च २०२६ पासून सॅमसंग डॉट कॉम, ॲमेझॉन आणि निवडक रिटेल आउटलेट्सवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. 'वाइब व्हायोलेट' आणि 'ब्लिट्झ ब्लू' अशा दोन आकर्षक रंगांमध्ये हा फोन सादर करण्यात आला आहे.

बॅटरी आणि परफॉर्मन्सचा 'पॉवरहाऊस'
गॅलेक्सी M17e 5G मध्ये ६००० mAh ची अवाढव्य बॅटरी देण्यात आली आहे, जी एकदा चार्ज केल्यावर दिवसभर गेमिंग, स्ट्रीमिंग आणि व्हिडिओ कॉल्ससाठी पुरेशी आहे. याशिवाय, फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ६३०० 5G प्रोसेसर आणि ARM माली-G57 GPU वापरण्यात आला आहे, ज्यामुळे मल्टीटास्किंग अधिक सुलभ होते.

Advertisement

डिस्प्ले आणि डिझाइन
डिस्प्ले: ६.७-इंच स्क्रीनसह १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट, ज्यामुळे स्क्रोलिंग आणि गेमिंगचा अनुभव अत्यंत स्मूथ मिळतो.
डिझाइन: ८.२ मिमी स्लिम प्रोफाइल आणि टिकाऊ ग्लास फायबर रिइन्फोर्स पॉलिमर (GFRP) बॅकमुळे हा फोन दिसायला स्टायलिश आणि पकडण्यास आरामदायी आहे. हा फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहण्यासाठी प्रमाणित (Certified) आहे.

कॅमेरा आणि इंटेलिजेंट फीचर्स
फोटोग्राफीसाठी यामध्ये ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे, जो कोणत्याही प्रकाशात स्पष्ट फोटो टिपण्यास सक्षम आहे. सेल्फीसाठी ८ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. विशेष म्हणजे, यामध्ये गुगल जेमिनी AI आणि 'सर्कल टू सर्च' सारखे प्रगत एआय टूल्स इनबिल्ट आहेत.

सुरक्षा आणि सॉफ्टवेअर सपोर्ट
सॅमसंगने सुरक्षिततेसाठी यामध्ये सॅमसंग नॉक्स वॉल्ट आणि ऑटो ब्लॉकर दिले आहे. तसेच, ग्राहकांना ६ वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स आणि ६ ओएस अपग्रेड्स देण्याचे आश्वासन कंपनीने दिले आहे, ज्यामुळे हा फोन प्रदीर्घ काळ अद्ययावत राहील.

"हा स्मार्टफोन मूल्य जागरूक तरुण वापरकर्त्यांसाठी एक परिपूर्ण पॅकेज आहे, ज्यांना दीर्घकाळ टिकणारी बॅटरी आणि उच्च दर्जाचा परफॉर्मन्स हवा आहे."
— अक्षय एस. राव, डायरेक्टर, सॅमसंग इंडिया (MX बिझनेस)

Comments

No comments yet.