नाशिक, (प्रतिनिधी) १८ मार्च - नाशिक ओपन वॉटर स्विमर्स (NOWS) आयोजित पहिली महाराष्ट्र राज्यस्तरीय 'नाशिक स्विमाथॉन - सीझन १' स्पर्धा नुकतीच वालदेवी धरण येथे मोठ्या उत्साहात पार पडली. नाशिकच्या निसर्गरम्य वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेत मुंबई, पुणे, ठाणे आणि संभाजीनगरसह संपूर्ण महाराष्ट्रातील ३४६ जलतरणपटूंनी आपला जलवा दाखवला.
या ऐतिहासिक स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक (IG) दत्तात्रय कराळे आणि नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) ओमकार पवार, किरण चव्हाण, तेजस चव्हाण यांसह आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी बोलताना मान्यवरांनी खेळाडूंच्या साहसाचे आणि स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजनाचे कौतुक केले.
नाशिकच्या एकमेव इंग्लिश चॅनल यशस्वीरीत्या पार केलेल्या तन्वी देवरे हिच्या कल्पनेतून 'नाशिक ओपन वॉटर स्विमर्स' क्लबची स्थापना झाली आहे. महाराष्ट्रातील धरणे आणि तलावांच्या माध्यमातून 'ओपन वॉटर स्विमिंग' या क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन देणे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. ८ वर्षांच्या चिमुरड्यांपासून ७० वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी ५०० मीटर, १ किमी आणि २ किमी अशा विविध गटांत या शर्यती पार पडल्या.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी तन्वी देवरे, जयेश फरताळे, संकेत कंसारा, प्रसाद खैरनार आणि निनाद निंबाळते यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच, महाराष्ट्र राज्य अॅम्युचर अॅक्वेटिक असोसिएशन (MSAAA), नाशिक जिल्हा अॅक्वेटिक असोसिएशन (NDAA) च्या सर्व सदस्यांचे व नाशिक जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग यांचे देखील या स्पर्धेसाठी मोलाचे सहकार्य लाभले.
स्पर्धेचे विजेते (क्रमश: प्रथम, द्वितीय व तृतीय)
१ किमी गट:
१२–१३ वर्षे (मुले): क्रिश विजय कुठे, अबीर मांडवकर, अभिर सलासकर.
१२–१३ वर्षे (मुली): गितिशा प्रविण भंडारे, श्रावणी भारती, विधी भोर.
३१–४० वर्षे (पुरुष): महेश कुठे, स्वप्निल सी, अमोल साहेबराव कवळे.
३१–४० वर्षे (महिला): डॉ. क्षितिजा विंचुरकर मणियार, ऋतुजा मनोहर भगवत, मैथिली शिंदे.
४१–५० वर्षे (पुरुष): अमोल अशोक देव, नरेश जी मंचे, गणेश जगन्नाथ जोशी.
४१–५० वर्षे (महिला): डॉ. अर्चना चंद्रकांत पालडे, जुई खर्डे, डॉ. मनीषा नितीन राऊंदळ.
५१–६० वर्षे (पुरुष): श्रीमंत शामराव गायकवाड, सतीश जिजाबराव पाटील, भोपाळ सिंह नेगी.
२ किमी गट:
१४–१५ वर्षे (मुले): सोहम खांबेकर, तनय लाड, शार्दूल केदार लाटे.
१४–१५ वर्षे (मुली): इयाना भावेश पटेल, रेवा परब, प्रिशा वर्मा.
१६–२० वर्षे (मुले): तनुज शिरसाट, स्यामन सावलिराम सटाले, अर्जुन काळे.
१६–२० वर्षे (मुली): गौरी राजेश झोळेकर, स्वरा सावंत, आकांक्षा जयंत जाधव.
२१–३० वर्षे (मुले): साहिल सुनील तेजाळे, पार्थ राठी, तनमय संजय कांबळे.
२१–३० वर्षे (मुली): आसावरी भाऊसाहेब निर्गुडे, पौर्णिमा अरुण पाटील, प्रेरणा विलास लिगाडे.
५०० मीटर गट:
८–९ वर्षे (मुले): हर्षवर्धन केतन कार्लेकर, श्रीजीत अभिजित भोसले, सिद्ध मुप्पिनेटी.
८–९ वर्षे (मुली): दुर्वा कुरणकर, शरण्या राजकुमार बेजगमवार, प्रिशा राजेश तुली.
१०–११ वर्षे (मुले): रक्षणसिधू नादर, नील नक्ती, तनय लोधा.
१०–११ वर्षे (मुली): सुनील कुमार शेट्टी, देवांशी प्रशांत अष्टणकर, आर्शती अमोल चिंडामवार.
६१–७० वर्षे (ज्येष्ठ नागरिक): दीपक भोसले, पाटील शंताराम दयाराम, दत्तात्रय पांडुरंग कुलकर्णी.