नाशिकमध्ये चोरट्यांचा उच्छाद...  एकाच दिवसात पाच लाखांहून अधिकचा ऐवज लंपास...

Share:
Last updated: 18-Mar-2026

 

 

नाशिक (प्रतिनिधी) दि. १८ मार्च २०२६

नाशिक शहर आणि परिसरात चोरीच्या घटनांचे सत्र थांबता थांबेनासे झाले असून, मंगळवारी (दि. १७) अज्ञात भामट्यांनी धुमाकूळ घातला. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडण्यासोबतच, सातपूरमधील एका कारखान्यात धाडसी चोरी आणि रिक्षाप्रवासात महिलेचे मंगळसूत्र लंपास करण्यात आले. या सर्व घटनांमध्ये सुमारे साडेपाच लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

 

दुचाकीस्वार भामट्यांची दहशत: दोन महिलांना लुटले

Advertisement

शहरात 'चैनस्नॅचिंग'च्या दोन घटना घडल्या असून भामट्यांनी महिलांना लक्ष केले आहे:

रिक्षाप्रवासात सव्वादोन लाखांचे मंगळसूत्र लंपास

सिन्नर येथील रहिवासी ज्योती कौटकर या नाशिकरोड परिसरात रिक्षाने प्रवास करत असताना त्यांच्या पर्समधील पाकीट चोरट्यांनी शिताफीने चोरले. या पाकिटात २ लाख २५ हजार रुपये किमतीचे ४५ ग्रॅम वजनाचे फॅन्सी मंगळसूत्र होते. नाशिकरोड पोलीस ठाण्यात याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातपूरमधील कारखान्यात चोरी; चोरटे सीसीटीव्हीत कैद

सातपूर औद्योगिक वसाहतीतील 'साई राकेश इंडिया प्रा. लि.' या कारखान्यात सोमवारी पहाटे दोन चोरट्यांनी डल्ला मारला. चोरट्यांनी कारखान्यातून लॅपटॉप, मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे कॉपर असा सुमारे १ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, सातपूर पोलीस चोरट्यांचा माग काढत आहेत.

 

 

Advertisement

Comments

No comments yet.