बार्टीकडून जेईई-नीट प्रशिक्षणार्थ्यांची माहिती चक्क खासगी क्लासेसना?

Share:
Main Image
Last updated: 15-Mar-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १५ मार्च - जे.ई.ई. व नीट परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींची कोणतीही माहिती बार्टी मार्फत खासगी शिकवणी चालकांना दिलेली नाही, असे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी सांगितले. सदस्य राजेश राठोड यांनी याविषयी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य सचिन अहिर यांनी सहभाग घेतला.

Advertisement

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले, यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यानंतर विभागाकडून त्याची चौकशी करण्यात आली असता, अशी कोणतीही गोपनीय माहिती देण्यात आली नसल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. बार्टीचे कामकाज अधिक गतिमान व्हावे, विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी विधिमंडळ सदस्यांच्या सूचनांचा विचार केला जाईल. तसेच  या विषयी लवकरच बैठक आयोजित केली जाईल, असेही सामाजिक न्याय मंत्री शिरसाट यांनी या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

Advertisement

Comments

No comments yet.