संत एकनाथ महाराज समाधी परिसरात साकारणार ‘संत सृष्टी’...

Share:
Main Image
Last updated: 15-Mar-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १५ मार्च - पैठण येथे पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या उभारणीसाठी पहिल्या टप्प्यात आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामांना सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत पर्यटन विभागाच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना दिली.

Advertisement

पर्यटन मंत्री देसाई म्हणाले, आपेगाव आणि संत एकनाथ महाराज समाधी परिसरात ‘संत सृष्टी’ उभारण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. अधिवेशनानंतर केंद्रीय पर्यटन मंत्र्यांसोबत चर्चा करून या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यात येईल. आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांमार्फतही केंद्राकडे यासाठी प्राधान्याने पाठपुरावा केला जाईल. तीर्थक्षेत्र विकास योजना प्रामुख्याने ग्रामीण विकास विभागामार्फत राबवली जाते. मात्र अन्य ठिकाणी पर्यटन स्थळांच्या विकासासाठी प्रस्ताव सादर केल्यास पर्यटन विभागाकडून त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल.

मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसनाशी संबंधित उपस्थित झालेल्या काही मुद्यांवर बोलताना पात्रतेसाठी वीज बिलाचा पुरावा ग्राह्य धरला जातो; मात्र बनावट वीज बिलांच्या तक्रारी आल्यास त्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असेही मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.

Comments

No comments yet.