सिंहस्थ कुंभमेळ्यात तुम्हाला होता येणार ‘टूर गाईड’... येथे मिळेल प्रशिक्षण... लगेच करा अर्ज...

Share:
Main Image
Last updated: 15-Mar-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १४ मार्च - आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये येणाऱ्या पर्यटकांना स्थानिक पर्यटन स्थळांची  माहिती मिळावी तसेच स्थानिक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन विभागांतर्गत पर्यटन संचालनालयामार्फत पर्यटन सुलभ मार्गदर्शक (टूर गाईड) प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. इच्छुकांनी गुगल लिंकवर 16 मार्च 2026 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन पर्यटन संचालनालय, उपसंचालक डॉ. नंदकुमार राऊत यांनी केले आहे.

या प्रशिक्षणासाठी नाशिक प्रादेशिक विभागातील इच्छुक उमेदवारांना सहभागी होता येणार आहे. या प्रशिक्षण उपक्रमाद्वारे नाशिक परिसरातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांबाबत पर्यटकांना मार्गदर्शन करण्यासाठी स्थानिक युवकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पर्यटन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंट (IITTM), ग्वाल्हेर तसेच महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातील तज्ज्ञ प्रशिक्षक प्रशिक्षण देणार आहेत. सात दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थींना पर्यटन संचालनालयाकडून प्रमाणपत्र देण्यात येईल तसेच कुंभमेळा कालावधीत टूर गाईड म्हणून काम करण्यासाठी ओळखपत्र देण्यात येणार आहे.

Advertisement

पात्रता निकष :
•    वयोमर्यादा : किमान १८ वर्षे व कमाल ४५ वर्षे
•    शैक्षणिक पात्रता : किमान कोणत्याही शाखेतील पदवीधर

फिरस्तीची आवड असलेल्या युवकांनी या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेऊन आपल्या आवडीला करिअरची दिशा द्यावी, असे आवाहन उपसंचालक डॉ.  राऊत यांनी केले आहे.

इच्छुक उमेदवारांनी खालील गुगल लिंकवरून १६ मार्च २०२६ रोजी दुपारी २  वाजेपर्यंत अर्ज करावा. अर्जांची निवड प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर करण्यात येणार आहे.
अर्जासाठी लिंक :
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeZguKyT97YkGbp8tx3Pp6Y6FaYKwT6Eu8kZ_p1zyEhI6_OBA/viewform?usp=header

Comments

No comments yet.