‘महाराष्ट्र सैनिक’ नाही, आता महाराष्ट्राचे... मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा एल्गार...

Share:
Main Image
Last updated: 10-Mar-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १० मार्च -  "महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता कात टाकत आहे. या प्रक्रियेत सक्रिय होणाऱ्या प्रत्येकाला योग्य संधी मिळेल, ही माझी खात्री आहे. तुम्ही केवळ पक्षाचे सदस्य नाही, तर महाराष्ट्राचे पाईक व्हा," असे भावनिक आणि आक्रमक आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील तरुण-तरुणींना केले आहे. आजपासून संपूर्ण राज्यात मनसेच्या भव्य सदस्य नोंदणी मोहिमेचा शुभारंभ होत असून, खुद्द राज ठाकरेंनी काल छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आपली नोंदणी पूर्ण केली.

राजकीय विचारधारेपेक्षा 'महाराष्ट्र वेड' महत्त्वाचे
राज ठाकरे यांनी आपल्या आवाहनात स्पष्ट केले की, मनसेमध्ये प्रवेश करण्यासाठी जात, धर्म किंवा जुनी राजकीय विचारधारा अडसर ठरणार नाही. "तुमच्याकडे केवळ महाराष्ट्रासाठी काहीतरी करून दाखवण्याचे वेड असायला हवे, ते आमच्यासाठी पुरेसे आहे," अशा शब्दांत त्यांनी तरुणाईला साद घातली आहे. आगामी काळात राज्याच्या विकासाला नवी दिशा आणि आकार देण्यासाठी अनेक नवनवीन उपक्रम राबवले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

सक्रिय सदस्यांना मिळणार मोठी संधी
केवळ नावापुरते सदस्य न होता, जे तरुण 'सक्रिय सदस्य' म्हणून पक्षात योगदान देतील, त्यांच्यासाठी मनसेची दारे पूर्णपणे उघडी असतील. पक्षाच्या पुनर्बांधणीच्या प्रक्रियेत या नवीन चेहऱ्यांना योग्य स्थान आणि संधी मिळेल, याची ग्वाही राज ठाकरे यांनी स्वतः दिली आहे.

Advertisement

या मोहिमेमुळे येत्या काळात मनसेची ताकद वाढणार असून, राज्याच्या राजकारणात 'नवनिर्माण' पर्वाचा नवा अध्याय सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत.

नोंदणी कशी कराल?
मनसेची ही सदस्य नोंदणी मोहीम अत्यंत हायटेक आणि सर्वसमावेशक पद्धतीने राबवली जात आहे:
प्रत्यक्ष नोंदणी: संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी, शाखांच्या बाहेर आणि गर्दीच्या ठिकाणी मनसे सैनिकांकडून स्टॉल्स लावले जाणार आहेत.
डिजिटल नोंदणी: तंत्रज्ञानाचा वापर करत, प्रसिद्ध करण्यात आलेल्या QR कोड स्कॅन करून नागरिक घरबसल्या आपली नोंदणी पूर्ण करू शकतात.

"महाराष्ट्रासाठी असंख्य आंदोलनं करणारा आणि राज्याचा विस्तृत विकास आराखडा (Blue Print) मांडणारा हा एकमेव पक्ष आहे. या परिवारात सामील होण्याची संधी सोडू नका."
— राज ठाकरे (अध्यक्ष, मनसे)

?s=20

Comments

No comments yet.