अल्पवयीन मुलीवर निर्जनस्थळी अत्याचार... मोबाइलमध्ये काढला व्हिडीओ...

Share:
Main Image
Last updated: 10-Mar-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १० मार्च - शहरातील चेहडी परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीच्या अजाणपणाचा फायदा घेत तिला नदीकाठच्या निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. धक्कादायक म्हणजे, पीडितेवर एकाने बलात्कार केला, तर दुसऱ्या नराधमाने या कृत्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात 'पोक्सो'सह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी (दि. ४) दुपारच्या सुमारास घडली. चेहडी परिसरातील पीडित अल्पवयीन मुलगी घराबाहेर असताना, संशयित परश्या जाधव आणि त्याच्या एका साथीदाराने तिला गाठले. तिला कोणत्यातरी गोष्टीचे आमिष दाखवून फूस लावून नदीकाठच्या झाडाझुडपात नेण्यात आले. या निर्जनस्थळी संशयिताने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला, तर त्याच्या साथीदाराने या घटनेचा व्हिडिओ बनवला.

Advertisement

अशी उघड झाली घटना
पीडित मुलगी घरी परतल्यानंतर ती प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत होती. कुटुंबीयांनी तिला विचारपूस केली असता, तिने रडत रडत आपल्यासोबत घडलेली 'आपबिती' कथन केली. हे ऐकून धक्का बसलेल्या पालकांनी तातडीने नाशिकरोड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

पोलीस कारवाई
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून संशयित परश्या जाधव व त्याच्या साथीदाराविरुद्ध भारतीय दंड विधान आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो - POCSO) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
तपास सुरू: या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कोरडे करत असून, संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, अशा नराधमांना कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

नाशिक : पूर्ववैमनस्यातून एका डॉक्टरने पाठलाग करीत महिलेस दमदाटी केल्याचा प्रकार कुलकर्णी गार्डन भागात घडला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. गिरीश अरूण कंदलकर (रा.विंचूररोड येवला जि.नाशिक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित डॉक्टरचे नाव आहे. पिडीता रविवारी (दि.८) सकाळच्या सुमारास नोकरीवरून घराकडे पायी जात असतांना हा प्रकार घडला. संशयिताने तिचा पाठलाग करीत कुलकर्णी गार्डन भागात वाट अडविली. या ठिकाणी जुन्या वादाची कुरापत काढून महिलेस शिवीगाळ केली तसेच मी तुला पाहून घेतो अशी दमदाटी केल्याचा फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. हवालदार गांगुर्डे करीत आहेत.

Comments

No comments yet.