कमल हसन यांनी या चित्रपटासाठी घेतले तब्बल इतके कोटी... सगळीकडे चर्चा तर होणारच...

Share:
Main Image
Last updated: 08-Mar-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ८ मार्च - दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि दीपिका पदुकोण यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. या चित्रपटातील पात्रांची आणि व्हिज्युअल इफेक्ट्सची जितकी चर्चा झाली, तितकीच चर्चा आता त्यातील कलाकारांच्या मानधनाची होत आहे. विशेषतः ज्येष्ठ अभिनेते कमल हासन यांनी या चित्रपटातील 'सुप्रीम यास्किन' या भूमिकेसाठी घेतलेल्या मानधनाचा आकडा समोर आला असून त्याने सर्वांचे डोळे विस्फारले आहेत.
चित्रपटात कमल हासन यांची भूमिका लांबीने कमी असली तरी ती अत्यंत प्रभावी होती. मिळालेल्या माहितीनुसार, या भूमिकेसाठी त्यांनी मोठे मानधन आकारले आहे. तमिळ अभिनेते युगी सेतू यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

Advertisement

एका दिवसाचे मानधन कोटींच्या घरात
युगी सेतू यांनी सांगितले की, कमल हासन यांनी 'कल्की २८९८ एडी' या चित्रपटासाठी एकूण २० ते २५ कोटी रुपये मानधन घेतल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटासाठी त्यांनी केवळ १० ते १५ दिवस चित्रीकरण केले होते. जर या हिशोबाने पाहिले तर कमल हासन यांनी एका दिवसासाठी साधारणपणे १.५ ते २ कोटी रुपये मानधन घेतल्याचे समजते.

पुढील भागात भूमिकेची व्याप्ती वाढणार
'कल्की २८९८ एडी'च्या पहिल्या भागात कमल हासन यांची भूमिका मर्यादित काळासाठी पडद्यावर दिसली होती. मात्र, चित्रपटाच्या शेवटी त्यांच्या पात्राने घेतलेले वळण पाहता, दुसऱ्या भागात (Kalki Part 2) ते मुख्य खलनायकाच्या रूपात दिसणार हे स्पष्ट झाले आहे. पुढील भागात त्यांच्या भूमिकेची व्याप्ती मोठी असणार आहे, त्यामुळे साहजिकच त्यांच्या मानधनातही मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नाग अश्विन यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाने जगभरात १२०० कोटींहून अधिक कमाई करत नवा इतिहास रचला आहे. आता प्रेक्षकांना याच्या दुसऱ्या भागाची उत्सुकता लागली असून, त्यात कमल हासन यांचा नेमका कोणता अवतार पाहायला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments

No comments yet.