नाशकात प्रख्यात महिला डॉक्टरची आत्महत्या... वैद्यकीय क्षेत्रात खळबळ...

Share:
Main Image
Last updated: 07-Mar-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ७ मार्च - शहरातील उच्चभ्रू वस्ती मानल्या जाणाऱ्या गंगापूर रोड परिसरात एका ४० वर्षीय महिला डॉक्टरने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. ६) घडली. मृत महिलेचे पती जिल्हा रुग्णालयात मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत असून, इतरांचे मानसिक आरोग्य सावरणाऱ्या डॉक्टरांच्याच घरात घडलेल्या या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
डॉ. मानिषा निलेश जेजुरकर (४०) असे मृत महिला डॉक्टरचे नाव आहे. त्या व्यवसायाने बीएएमएस होत्या.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. मानिषा या गंगापूर रोडवरील 'रेवती ब्ल्यू अपार्टमेंट' येथे वास्तव्यास होत्या. शुक्रवारी दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास त्यांनी राहत्या घरातील खिडकीच्या लोखंडी गजाला नायलॉन दोरीने गळफास लावून घेतला. ही बाब लक्षात येताच त्यांचे बंधू गौरव राजेश्वर भाबड यांनी तातडीने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल) उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले.

Advertisement

वैद्यकीय क्षेत्रात चर्चा आणि हळहळ
मयत मानिषा यांचे पती डॉ. निलेश जेजुरकर हे नाशिक जिल्हा रुग्णालयात मानसोपचार तज्ज्ञ (Psychiatrist) म्हणून सेवेत आहेत. समाजात वाढत्या मानसिक तणावावर उपचार करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांच्याच कुटुंबात अशी दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

पोलीस तपास सुरू
या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात सध्या 'अकस्मात मृत्यू'ची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून कुटुंबातील सदस्यांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे.

नाशिक : शहरातील वेगवेगळ््या भागात राहणाºया दोन तरूणांनी शुक्रवारी (दि.६) गळफास लावून घेत आत्महत्या केली. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत पंचवटी व नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
हिरावाडीतील संकेत विश्वनाथ दरेकर (२३ रा.श्री निवास प्राईड, शिवकृपानगर) या युवकाने गुरूवारी रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये छताच्या हुकाला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून हवालदार पाटील तपास करीत आहेत. दुसरी घटना जेलरोड भागात घडली. सिध्दार्थ गणेश बढे (२१ रा.आयोध्यानगर पंचक, जेलरोड) या युवकाने शुकवारी रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घराच्या वरच्या मजल्यावरील बेडरूममध्ये पंख्यास बेडसिट बांधून गळफास लावून घेतला होता. वडिल गणेश बन्सी यांनी त्यास तात्काळ बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार भोळे करीत आहेत.

Comments

No comments yet.