नाशिक, (प्रतिनिधी) ५ मार्च - शहरातील नामांकित एनबीटी लॉ कॉलेजमध्ये चोरीची एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी थेट प्राचार्यांच्या (प्रिन्सिपल) केबिनमध्ये प्रवेश करून एका महिला शिक्षिकेचा लॅपटॉप आणि वैयक्तिक वॉलेट चोरून नेले. याप्रप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
प्रतिक्षा प्रशांत केळकर (रा. उंटवाडी, नाशिक) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. केळकर या एनबीटी लॉ कॉलेजमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी (दि. ४) त्या नेहमीप्रमाणे महाविद्यालयात आपल्या कर्तव्यावर होत्या. दुपारच्या सुमारास त्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वर्गात गेल्या होत्या.
संधी साधून डल्ला मारला
प्रतिक्षा केळकर वर्गात असताना, प्रिन्सिपल ऑफिसमध्ये कुणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला. चोरट्याने तेथून सुमारे ४० हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला, ज्यामध्ये खालील वस्तूंचा समावेश होता:
महागडा लॅपटॉप व चार्जर
पर्स (वॉलेट)
महत्त्वाची कागदपत्रे
महाविद्यालयासारख्या गजबजलेल्या ठिकाणी आणि तेही थेट प्रशासकीय कार्यालयात शिरून चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या घटनेमुळे शैक्षणिक परिसरात सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्याचे हवालदार गायकवाड पुढील तपास करत आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरट्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
नाशिक : बसमध्ये चढतांना चोरट्यांनी महिलेच्या पर्स मधील पाकिट हातोहात लांबविले. या पाकिटात पट्टीपोतसह सुमारे १ लाख ८० हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिणे होते. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुवर्णा बापू देवरे (रा.पाटील नगर सिडको) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. देवरे मंगळवारी (दि.३) दुपारच्या सुमारास सय्यद पिंप्री येथे जाण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आल्या होत्या. सीटी लिंक बसच्या थांब्यावर त्या एमएच १५ जीव्ही या बसमध्ये चढत असतांना ही घटना घडली. सीबीएस ते सय्यद पिंप्री या १३३ नंबरच्या बसमध्ये त्या चढत असतांना गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ््यातील पर्सची चैन उघडून मिनी पाकिट चोरून नेले. या पाकिटात सोन्याची पट्टी पोत. हार व नाकातील नथ असा सुमारे १ लाख ८० हजार रूपये किमतीचे अंलकार होते. अधिक तपास हवालदार घेगडमल करीत आहेत.