आमदार पंकज भुजबळ यांनी विचारलेल्या प्रश्नामुळे राज्यातील ग्रामीण महिलांना होणार हा फायदा...

Share:
Main Image
Last updated: 05-Mar-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ५ मार्च - महिलांमध्ये वाढत असलेल्या स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून तपासणी शिबिर राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागापर्यंत हे स्वरूप अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने कंपन्यांच्या  सीएसआर निधीची मदत घेतली जाईल अशी माहिती आमदार पंकज भुजबळ यांनी विधानपरिषदेत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज विधानपरिषद सभागृहात आमदार विक्रम काळे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली. यामध्ये आमदार पंकज भुजबळ यांनी सहभाग घेऊन प्रश्न उपस्थित केले.

महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचा (Breast and Cervical Cancer) हा गंभीर प्रश्न सभागृहात उपस्थित केला. या आजाराचे लवकर निदान झाल्यास वेळेत उपचार करून महिलांचा जीव वाचवला जाऊ शकतो. म्हणून यासाठी शासन ठोस धोरणं आखणार आहे का? असा प्रश्न आमदार पंकज भुजबळ यांनी लक्षवेधी सूचनेवर  उपस्थित केला.

Advertisement

तसेच मुंबईसह ग्रामीण भागात मोफत मॅमोग्राफी (Mammography)व पॅप स्मिअर (Pap Smear)तपासणीची सुविधा उपलब्ध करून दिल्यास हा गंभीर आरोग्याचा प्रश्न सोडविण्यास मदत होऊ शकते, यासाठी सरकार सर्वत्र मोफत तपासणीची सुविधा सुरु करणार का? अशी देखील विचारणा सरकारला केली. त्याचबरोबर केवळ सरकारी निधीवर अवलंबून न राहता, जास्तीत जास्त महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी सीएसआर (Corporate Social Responsibility) निधीचा महत्त्वाचा पर्याय सुचवला. विविध कंपन्यांना या मोहिमेत सहभागी करून घेतल्यास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महिला भगिनींमधील कर्करोगाचे वेळेत निदान व उपचार करणे शक्य होईल, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

या प्रश्नावरील उत्तरात सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, आपण मांडलेल्या या सूचनेबाबत शासनाकडून सकारात्मक असून कॉर्पोरेट कंपन्यांसोबत बैठक घेऊन 'सीएसआर' निधीचा या लोककल्याणाच्या कामात समावेश करण्याचा निर्णय घेऊ, असे त्यांनी आश्वासित केले आहे.

Comments

No comments yet.