येवला, (प्रतिनिधी) ४ मार्च - विकास ही न संपणारी प्रक्रिया आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून मतदारसंघात अनेक विकासाची कामे झाली आहे. पिण्याचे पाणी, सिंचन, वीज, आरोग्य, शाळा यासह विविध विकासाची कामे झाली आहे. यापुढील काळातही विकासाची ही कामे यापुढील काळातही अविरतपणे सुरू राहतील. येवला मतदारसंघातील नागरिकांचे जे प्रश्न असतील ते मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून मंजूर करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते आज भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. तसेच विविध गावामध्ये माजी खासदार समीर भुजबळ यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, ज्येष्ठ नेते अरुणमामा थोरात, जलचिंतन सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन शेलार, सचिन कळमकर, मकरंद सोनवणे, अशोक कुळधर, विजय खैरनार, विजय जेजुरकर, आर.डी.खैरनार, मच्छिंद्र थोरात, नितीन गायकवाड, भगवान ठोंबरे, दिनकर लोहकरे, रंजनाताई पठारे, अनिल दारूंटे, योगिता निघूट, भाऊसाहेब धनवटे, सुभाष जेजुरकर, नामदेव सोनवणे, कारभारी बागल, रतन जेजुरकर, तात्यासाहेब जेजुरकर, रावसाहेब जेजुरकर, प्रकाश बागल, गणेश गवळी, नवनाथ थोरात, नितीन वाहूळ, दिपक गायकवाड, सागर गवळी, देविदास जानराव, रेखाताई जानराव, उस्मान शेख, शाहरुख शेख, बाबूभाई शेख,आसिफ मुलतानी, नासिर मुलतानी, युनूस मुलतानी, अब्बास पटेल, अजिज पटेल,जनार्दन कामोदकर,जालिंदर गाडेकर, दिलीप आहेर, दत्तात्रय आहेर, शरद धनवटे, पुंडलिक आवारे, बाळासाहेब चव्हाण, बाळासाहेब आवारे, संतोष पेंढारकर, शशिराव आवारे, विक्रम कदम, प्रवीण जेजुरकर, शंकर भांडे, बाळासाहेब भांडे, इकबाल शेख, शिवाजी येवले, वाल्मीक जेजुरकर, साईनाथ कदम, निजाम शेख, गणी शेख, आण्णासाहेब चव्हाण, सोपान पानसरे, भागीनाथ जेजुरकर, विशाल कदम, अर्जुन गायकवाड, प्रवीण मोरे, बबन चव्हाण, इस्माईल शेख,शामभाऊ बावचे, शरद बावचे, संदेश बावचे, सुनील बावचे, रामभाऊ गायकवाड, शैलेश गायकवाड, बबन रोठे, लक्ष्मण सुरासे, बबन गायकवाड, नंदू जाधव, बाळनाथ सोमासे, कचरु मुदगल, रामभाऊ डुंबरे, गणेश कदम, पौलस आहिरे, रघुनाथ बर्डे, नामदेव कदम, शंकर कदम, गौतम आहिरे, किरण आहिरे, प्रकाश कदम, वनराज पगारे, सोमराज पगारे, भारत सोनवणे, दत्तू धुमाळ, वाल्मीक मगर, राहुल मगर, गजानन नाईकवाडी, फारूख शेख, हरुन शेख, कचरु चव्हाण, केशव मगर, बापू मोरे, राजू पठाण, बाबासाहेब भागवत,सुदाम गायकवाड, देवराज भागवत, ताराचंद भागवत, अमोल उगले, अरुण भागवत,किरण गायकवाड, अरविंद गायकवाड, उत्तम भागवत यांच्यासह नायब तहसीलदार पंकज नेवसे, विवेक चांदवडकर यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी स्मार्ट शाळा निर्माण
करण्यासाठी आपले प्रयत्न आहे. त्यासाठी आवश्यक ती सामग्री उपलब्ध करून देण्यात येतील. मतदारसंघातील नागरिकांचे रेशनकार्डसह विविध दाखले काढण्यासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. कुठलाही नागरिक दाखल्यांपासून वंचित राहणार नाही असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, ज्या गावांना पाणीटंचाईची परिस्थिती आहे. त्यांनी तातडीने प्रस्ताव सादर करावे. पिण्याच्या पाण्यापासून कुणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल. नागरिकांच्या रस्ते, सिंचन, वीज यासह जे विकासाचे प्रश्न असतील ते प्राधान्याने सोडविले जातील. विकासाच्या कामात गावातील नागरिकांनी एकत्र येऊन ती कामे मार्गी लाऊन घ्यावी. गावच्या विकासात कुठंही अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी ग्रामस्थानी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते आज या विकास कामांचे झाले भूमिपूजन व लोकार्पण
सायगांव येथे तलाठी कार्यालय बांधकाम करणे कामाचे लोकार्पण (र.रु. ३३ लक्ष)
सायगांव येथील रामवाडी येथील श्रीराम मंदिर समोरील सभामंडप कामाचे लोकार्पण (र.रु. १० लक्ष)
सायगांव येथील स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत रोकडोबा मंदिर समोरील सभामंडपाचे लोकार्पण (र. रु. १५ लक्ष)
सायगांव येथील शेख वस्तीे येथे अल्पसंख्यांक निधी अंतर्गत शादीखाना कामाचे लोकार्पण (र.रु.१५ लक्ष)
सायगांव येथे दलितवस्ती मध्ये व्यायामशाळा इमारत बांधकाम करणे कामाचे लोकार्पण (र.रु.०७ लक्ष)
सायगांव येथे जि.प. प्राथ. शाळा इमारत दुरुस्ती कामाचे लोकार्पण (र.रु४ लक्ष)
सायगांव येथे वित्तआयोग अंतर्गत जि.प. प्राथ. शाळा स्वाच्छता गृह व पेव्हर ब्लॉक कामाचे लोकार्पण (र.रु.०३ लक्ष)
सायगांव येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नविन इमारत कामाचे भुमीपूजन (र.रु. ७० लक्ष)
सायगांव येथे तांडावस्ती सुधार योजनेंतर्गत रस्ता व सभामंडप कामाचे भुमीपूजन (एकुण ४ कामे) (र.रु. ४० लक्ष)
सायगांव येथे स्मशानभुमी मध्ये बैठक व्यावस्था व रस्ता कॉक्रिटीकरण कामाचे लोकार्पण (र.रु.१४लक्ष)
न्याहारखेडे बु. येथे जि.प. दोन वर्ग खोल्या बांधकाम करणे कामाचे भुमीपूजन (र.रु. २० लक्ष)
वाईबोथी येथे ग्राम महसुल अधिकारी कार्यालय बांधकाम करणे कामाचे लोकार्पण (र.रु. ३५ लक्ष)
रस्तेसुरेगांव येथे मुलभूत सुविधा योजेंतर्गत खंडेराव महाराज मंदिराजवळ सभामंडप कामाचे भुमीपूजन (र.रु. १५ लक्ष)
गवंडगांव येथे स्थानिक विकास निधी अंतर्गत ग्राम महसुल अधिकारी कार्यालय बांधकाम करणे कामाचे भुमीपूजन (र.रु. १२ लक्ष)
गवंडगांव येथे अंगणवाडी इमारत बांधकाम करणे कामाचे भुमीपूजन (र.रु. ११ लक्ष)