येवला शहरात असे झाले होलिका दहन...

Share:
Main Image
Last updated: 02-Mar-2026

येवला, (प्रतिनिधी) २मार्च - सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक ऐक्य जपणाऱ्या येवला शहरात होळीला विशेष ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर आज येवला येथील संपर्क कार्यालयाच्या प्रांगणात माजी खासदार समीर भुजबळ व डॉ.शेफाली भुजबळ यांच्या हस्ते विधिवत पूजन करून पारंपरिक पद्धतीने होलिका दहन करण्यात आले.

येवला शहरात होळी हा सण केवळ धार्मिक विधी नसून सामाजिक एकात्मतेचा आणि बंधुभावाचा उत्सव म्हणून ओळखला जातो. अनेक वर्षांची परंपरा जपत नागरिक मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात होलिका दहन सोहळ्यात सहभागी होतात. वाईट प्रवृत्तींचा नाश आणि सद्गुणांचा विजय याचे प्रतीक असलेला हा सण शहराच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग आहे. माजी खासदार समीर भुजबळ व डॉ.शेफाली भुजबळ यांच्या हस्ते होलिका पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर होलिका दहन करण्यात आले.

यावेळी येवला नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, शहराध्यक्ष दत्ता निकम, नगरसेवक दिपक लोणारी, नगरसेवक प्रवीण बनकर, नगरसेवक गोटू मांजरे, राजेश भांडगे, अल्केश कासलीवाल, सुहास भांबारे, मकरंद सोनवणे, भाऊसाहेब धनवटे, निसार लिंबुवाले, संतोष खैरनार, समाधान जेजुरकर, सुनील पैठणकर, नितीन गायकवाड, मलिक मेंबर, दीपक गायकवाड, भूषण लाघवे, सुमित थोरात, पार्थ कासार, नितीन आहेर, देविदास निकम, प्रा.संतोष राऊळ, सचिन सोनवणे, महेश गादेकर, दिपक पवार, समाधान पगारे, संतोष जगदाळे, गणेश गवळी, सौरभ जगताप, राकेश कुंभारे, संतोष जेजुरकर, नवनाथ पोळ, श्रीकांत वाकचौरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी एकमेकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांनी येवला शहरातील होळी उत्सवाची परंपरा आणि सांस्कृतिक वैशिष्ट्य यांचा उल्लेख करत, “होळी हा सण आपल्याला एकत्र आणणारा आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा आहे. समाजात शांतता, प्रेम आणि बंधुता टिकवणे हीच खरी होळीची भावना आहे,” असे प्रतिपादन केले. तसेच उपस्थितांना होळीनिमित्त शुभेच्छा दिल्या.

Advertisement

Comments

No comments yet.