गोवर्धन ते सुला वाईन रस्त्यावरील मृत्यूप्रकरणी मंत्र्यांनी दिले हे आदेश...

Share:
Main Image
Last updated: 26-Feb-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २६ फेब्रुवारी - नाशिक येथील गोवर्धन ते सुला वाईन रस्त्यावरील मृत्यूप्रकरणी दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले. नाशिक येथील गोवर्धन ते सुला वाईन रस्त्यावरील मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी असा मुद्दा आमदार सीमा हिरे यांनी विधानसभेत मांडला. याला उत्तर देताना राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर बोलत होते.

Advertisement

नाशिक येथील गोवर्धन ते सुला वाईन रस्त्यावरील पाम स्प्रिंग हॉटेलसमोर अमंलीपदार्थाचे सेवन केलेल्या तरूणाने भरधाव वेगाने कार चालवत रस्त्यालगत असलेल्या व्यक्तीला धडक मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ८ मार्च २०२५ रोजी घडली होती. तातडीने या घटनेची दखल घेऊन पोलिसांनी गुन्हा नोंदवला. मुख्यमंत्री यांनी स्वत: यामध्ये लक्ष घातले आहे. तपासामध्ये दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून या प्रकरणात जे जे सहभागी असतील त्यांच्यावर देखील तातडीने कारवाई करण्यात येईल, असे डॉ. भोयर यावेळी सांगितले.

Comments

No comments yet.