चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया नाशिक शाखेच्या अध्यक्षपदी यांची नियुक्ती... अशी आहे नवीन कार्यकारिणी...

Share:
Main Image
Last updated: 23-Feb-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २३ फेब्रुवारी - इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) नाशिक शाखेच्या अध्यक्षपदी अभिजित मोदी यांची निवड झाली आहे. शाखेची २०२६-२७ या वर्षासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर झाली असून पदाधिकाऱ्यांनी सूत्रे स्वीकारली आहेत.

मावळते अध्यक्ष जितेंद्र फाफट यांनी नवीन कार्यकारिणीकडे पदभार सुपूर्द केला. त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे अभिजित मोदी यांच्याकडे सोपवली. मनोज तांबे यांची उपाध्यक्षपदी, विशाल वाणी यांची सचिवपदी, तर दिलीप बोसरे यांची कोषाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंट स्टुडंट असोसिएशन अर्थात विकासा कमिटीसाठी रोहन कुलकर्णी यांची चेअरमन म्हणून तर शुभम मुंडडा यांची सहसदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जितेंद्र फाफट कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत राहतील.

नवीन कार्यकारिणीने सदस्य व विद्यार्थ्यांसाठी अधिक प्रभावी शैक्षणिक उपक्रम, व्यावसायिक मार्गदर्शन व नेटवर्किंग कार्यक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.

Advertisement

Comments

No comments yet.