पंढरपूर कॉरिडॉरवरून फडणवीसांना घरचा आहेर... माजी केंद्रीय मंत्री आक्रमक...

Share:
Main Image
Last updated: 15-Feb-2026

 

पंढरपूर, (प्रतिनिधी), दि. १५ फेब्रुवारी २०२६ - पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील प्रस्तावित 'कॉरिडॉर' प्रकल्पाबाबत माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकल्पाचा पुनर्विचार करावा, अशी विनंती करणारे पत्र त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले असून, वारकरी संप्रदायाच्या हितासाठी ऐतिहासिक वारसा जतन करण्याचा सल्ला दिला आहे.

 

प्राचीन वारसा जतन करण्याचे आवाहन
पंढरपूरचा विकास करताना तेथील प्राचीन मठ, मंदिरे, ऐतिहासिक वाडे आणि स्थानिक नागरिकांची घरे उद्ध्वस्त केली जाऊ नयेत, अशी स्पष्ट भूमिका डॉ. स्वामी यांनी पत्राद्वारे मांडली आहे. विकास हा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मुळांना धक्का न लावता व्हायला हवा, असे त्यांनी नमूद केले आहे.

 

पत्रातील महत्त्वाचे मुद्दे:

पर्यायी मार्गाचा शोध:
वारकरी आणि भक्तांच्या भावना लक्षात घेऊन उध्वस्तीकरणाशिवाय पर्यायी व्यावहारिक मार्ग काढण्यात यावा.

Advertisement

 

वारशाचे रक्षण:
पंढरपूरचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपूनच विकास आराखडा राबवावा.

 

लोकभावनांचा आदर:
 स्थानिक रहिवासी आणि वारकरी संप्रदायाच्या हिताचा प्राधान्याने विचार व्हावा.

 

सोशल मीडियावरून व्यक्त केली आशा
या पत्राबाबत माहिती देताना डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे की, "मला आशा आहे की महाराष्ट्र सरकार विठ्ठल भक्तांच्या आणि वारकऱ्यांच्या हितासाठी संवेदनशील निर्णय घेईल. प्राचीन वास्तूंचे रक्षण करूनच पंढरपूरचे पावित्र्य राखले जाईल."

 

प्रकल्पाला स्थानिक विरोध कायम
प्रस्तावित कॉरिडॉरमुळे पंढरपुरातील अनेक जुने मठ आणि व्यापाऱ्यांची दुकाने बाधित होणार असल्याने स्थानिक पातळीवर मोठा विरोध होत आहे. आता या वादात डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी उडी घेतल्याने या प्रकरणाला राष्ट्रीय स्तरावर महत्त्व प्राप्त झाले आहे. मुख्यमंत्री या पत्रावर काय भूमिका घेतात
, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments

No comments yet.