वंदे भारत एक्सप्रेसमध्ये त्याने सोडला चक्क जिवंत साप... पुढं काय झालं?

Share:
Main Image
Last updated: 14-Feb-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १४ फेब्रुवारी - देशातील सर्वाधिक सुरक्षित आणि हाय-टेक मानल्या जाणाऱ्या 'वंदे भारत एक्सप्रेस'मध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या एका ३७ वर्षीय तरुणाला रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) बेड्या ठोकल्या आहेत. नाशिकच्या या प्रवाशाने गाडीच्या स्वच्छतागृहात चक्क जिवंत साप सोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, प्रवाशांच्या जीवाशी खेळल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली. रेल्वे प्रवासात असताना स्वच्छतागृहात साप आढळून आल्याने प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली होती. रेल्वे प्रशासनाने तात्काळ दखल घेत तपास सुरू केला असता, हा साप नैसर्गिकरित्या तिथे आला नसून तो जाणीवपूर्वक तिथे ठेवण्यात आल्याचे सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासावरून स्पष्ट झाले.

असा लागला छडा
मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने गाडीतील सीसीटीव्ही कॅमेरे आणि संशयास्पद हालचालींची बारकाईने तपासणी केली. तपासाअंती नाशिकमधील ३७ वर्षीय व्यक्तीने हा साप एका पिशवीतून आणला होता आणि प्रवाशांमध्ये घबराट निर्माण करण्याच्या उद्देशाने तो शौचालयात सोडल्याचे निष्पन्न झाले. संबंधित आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर रेल्वे कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशासनाचा इशारा: रेल्वेमध्ये अशा प्रकारचे कृत्य करणे हा गंभीर दखलपात्र गुन्हा आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेशी तडजोड करणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 

'सुपरफास्ट नाशिक'चे मुख्य संपादक, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक भावेश ब्राह्मणकर यांचे 'अरुणोदय' पुस्तक प्रकाशन पूर्व बुकिंगसाठी उपलब्ध झाले आहे.
प्रथितयश दिलीपराज प्रकाशनाने २५ टक्के घसघशीत सूट त्यासाठी दिली आहे. 
पुस्तक बुकिंगसाठी खालील लिंकवर क्लिक करावे

https://www.diliprajprakashan.in/products/arunoday-by-bhavesh-brahmankar

Advertisement

Comments

No comments yet.