नाशिक, (प्रतिनिधी) १२ फेब्रुवारी - पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून टोळक्याने तरूणावर धारदार तलवारीने हल्ला केल्याची घटना खडकाळी भागात घडली. या घटनेत युवक जखमी झाला असून, हल्लेखोरांंपैकी एकास पोलिसांनी तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जग्या उर्फ यश दत्ता मोंढे (२४ रा.पंचशिलनगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून करण सुनिल डिंगम व त्यांचा अनोळखी साथीदार अद्याप फरार आहेत. याबाबत गणेश हरी चौधरी (२६ रा. अप्सरा गॅरेजच्या बाजूला, खडकाळी ) या युवकाने याबाबत फिर्याद दिली आहे. चौधरी सोमवारी (दि.९) सायंकाळी खडकाळी येथील एमएस आर्ट या रेडियम दुकानासमोरून जात असतांना टोळक्याने त्यास गाठले. यश मोंढे विरोधात पोलीसात तक्रार का केली याबाबत जाब विचारत टोळक्याने शिवीगाळ करीत त्यास लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी मोंढे याने तूझा कायमचा काटा काढतो असे म्हणत चौधरीवर धारदार तलवारीने वार केले. या घटनेत तो जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हवालदार आहेर तपास करीत आहेत.
नाशिक : पाथर्डी गौळाणेरोडवरील पांडववन भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे सात लाख रूपये किमतीच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात ६० हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रंगनाथ अर्जुन मोरे (रा.बंगला नं.४ पांडववन,गौळाणेरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मोरे कुटूंबिय दोन दिवसांसाठी बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी गेल्या शुक्रवारी (दि.६) रात्री बंद बगल्याच्या बेडरूममधील खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला. घरात शिरलेल्या चोरट्यांनी कपाटातील रोकड व सोन्याचांदीचे दागिने असा ६ लाख ८३ हजार ४०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. सहाय्यक निरीक्षक सोनार तपास करीत आहेत.
'सुपरफास्ट नाशिक'चे मुख्य संपादक, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक भावेश ब्राह्मणकर यांचे 'अरुणोदय' पुस्तक प्रकाशन पूर्व बुकिंगसाठी उपलब्ध झाले आहे.
प्रथितयश दिलीपराज प्रकाशनाने २५ टक्के घसघशीत सूट त्यासाठी दिली आहे.
पुस्तक बुकिंगसाठी खालील लिंकवर क्लिक करावे
https://www.diliprajprakashan.in/products/arunoday-by-bhavesh-brahmankar