मानवामध्ये पहिली कोरोनरी अँजिओप्लास्टी करणारे डॉ. गौरव वर्मा यांना मिळाला हा जागतिक सन्मान...

Share:
Main Image
Last updated: 11-Feb-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ११ फेब्रुवारी - एसएमबीटी चॅरिटेबल हॉस्पिटलच्या हार्ट इन्स्टिट्यूटचे संचालक व वरिष्ठ इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. गौरव वर्मा यांना जागतिक स्तरावर मान्यता असलेली प्रतिष्ठित “अँड्रियास ग्रुएंत्झिग फेलोशिप” प्रदान करण्यात आली आहे. एसएमबीटी हॉस्पिटलच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्यात यश आले आहे. या सन्मानामुळे एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक हृदयरोग उपचार सेवांची गुणवत्ता पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाली आहे.

इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजीचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉ. अँड्रियास ग्रुएंत्झिग यांनी मानवामध्ये पहिली कोरोनरी अँजिओप्लास्टी यशस्वीरीत्या करून हृदयरोग उपचार क्षेत्रात क्रांती घडवून आणली. त्यांच्या कार्याची प्रेरणा जपत उत्कृष्ट योगदान देणाऱ्या निवडक तज्ज्ञांना ही प्रतिष्ठित फेलोशिप दिली जाते.

ए.सी.एल., लंडन यांच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय सोहळ्यात इटलीचे सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अँटोनियो कोलंबो आणि झुरिच (स्वित्झर्लंड) येथील नामांकित तज्ज्ञ डॉ. बर्नहार्ड मायर यांच्या हस्ते डॉ. गौरव वर्मा यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जटिल हृदयविकार उपचार, अँजिओप्लास्टी तसेच तावी (TAVI) सारख्या प्रगत प्रक्रियांच्या माध्यमातून रुग्णांना उच्च दर्जाची सेवा उपलब्ध करून देण्यात डॉ. वर्मा यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

या आंतरराष्ट्रीय गौरवामुळे एसएमबीटी हॉस्पिटलच्या प्रगत आरोग्यसेवेची प्रतिष्ठा अधिकच उंचावली असून संस्थेच्या व्यवस्थापन, अधिष्ठाता डॉ. मीनल मोहगावकर, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर सचिन बोरसे यांच्यासह  वैद्यकीय क्षेत्रातून डॉ. वर्मा यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अँड्रियास ग्रुएंत्झिग फेलोशिप हा सन्मान माझ्यासाठीच नव्हे तर एसएमबीटी हॉस्पिटलच्या संपूर्ण वैद्यकीय टीमसाठी अभिमानाची बाब आहे. जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानासह ग्रामीण व सर्वसामान्य रुग्णांना सर्वोत्तम हृदयरोग उपचार उपलब्ध करून देणे ही आमची सातत्याने चालणारी बांधिलकी आहे. 

- डॉ. गौरव वर्मा, संचालक, एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूट

 'सुपरफास्ट नाशिक'चे मुख्य संपादक, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक भावेश ब्राह्मणकर यांचे 'अरुणोदय' पुस्तक प्रकाशन पूर्व बुकिंगसाठी उपलब्ध झाले आहे.
प्रथितयश दिलीपराज प्रकाशनाने २५ टक्के घसघशीत सूट त्यासाठी दिली आहे. 
पुस्तक बुकिंगसाठी खालील लिंकवर क्लिक करावे

https://www.diliprajprakashan.in/products/arunoday-by-bhavesh-brahmankar

Advertisement

Comments

No comments yet.