रिक्षाचालकांची दांडगाई वाढली... थेट वाहतूक पोलिसालाच दमदाटी...

Share:
Last updated: 11-Feb-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ११ फेब्रुवारी - बेशिस्तीबाबत जाब विचारल्याने गोंधळ घालत रिक्षाचालकाने वाहतूक पोलीसांना दमदाटी केल्याचा प्रकार मेहर सिग्नल भागात घडला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयुर उत्तम शिरवाणी (रा.मोहित अपा.पपया नर्सरी जवळ,समर्थ नगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित रिक्षाचालकाचे नाव आहे. याबाबत शहर वाहतूक शाखेच्या युनिट २ पथकाचे सहाय्यक उपनिरीक्षक रामदास शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. शिंदे मंगळवारी (दि.१०) सकाळच्या सुमारास मेहर सिग्नल भागात सेवा बजावत असतांना ही घटना घडली. जमादार शिंदे व हवालदार गांगुर्डे या ठिकाणी सेवा बजावत असतांना एमजी रोडकडून फ्रंटसिट प्रवासी बसवून येणाºया अ‍ॅटोरिक्षास थांबविण्याचा प्रयत्न केला असता गणवेश परिधान केलेला नसलेल्या संशयित रिक्षाचालकाने आपले वाहन रस्त्यावर उभे करून आरेरावी केली.  समजवून सांगण्याचा प्रयत्न केला असता शिवीगाळ करीत संशयित हवालदार गांगुर्डे यांच्या अंगावर धावून गेला. यावेळी संशयिताने दोन्ही कर्मचाºयांना नोकरी घालवण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. हवालदार जाधव तपास करीत आहेत.

नाशिक : शहरात वाहनचोरीची मालिका सुरूच असून, वेगवेगळ्या भागातून तीन मोटारसायकली चोरट्यांनी नुकत्याच चोरून नेल्या. याप्रकरणी पंचवटी,आडगाव व इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हिरावाडीतील भुषण राजेंद्र चौधरी (रा.विमल अपा.आपला महाराष्ट्र कॉलनी,हिरावाडी) यांची मोटारसायकल त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार सोमवारी (दि.९) रात्री घडला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार पाटील तपास करीत आहेत. दुसरी घटना के.के.वाघ कॉलेज परिसरात घडली. रोहित दिलीप मोरे (रा. इच्छामणी हाईटस, मिरा दातार रोड के.के.वाघ कॉलेज मागे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मोरे यांची दुचाकी गेल्या मंगळवारी (दि.३) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार शेख तपास करीत आहेत. तर राहूल भरत पवार (रा.यशश्री अपा.माऊलीनगर,वासननगर पाथर्डी फाटा) यांची बुलेट रविवारी (दि.८) रात्री त्यांच्या अपार्टमेटच्या पार्किंगमधून चोरीस गेली. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार तळपाडे तपास करीत आहेत.

'सुपरफास्ट नाशिक'चे मुख्य संपादक, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक भावेश ब्राह्मणकर यांचे 'अरुणोदय' पुस्तक प्रकाशन पूर्व बुकिंगसाठी उपलब्ध झाले आहे.
प्रथितयश दिलीपराज प्रकाशनाने २५ टक्के घसघशीत सूट त्यासाठी दिली आहे. 
पुस्तक बुकिंगसाठी खालील लिंकवर क्लिक करावे

https://www.diliprajprakashan.in/products/arunoday-by-bhavesh-brahmankar

Advertisement

Comments

No comments yet.